सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्यामुळे नुसती जंगलात सिंहाची गर्जना जरी ऐकू आली, तरी इतर प्राण्यांचा थरकाप उडतो आणि ते तेथून पळ काढतात. प्राण्यांच्या मनात त्यांच्या जीवाची भीती असते, ज्यामुळे ते सिंहाला घाबरतात. तुम्ही विचार करा की, तुमच्या समोर अचानक सिंह आला तर? आणि तो त्याच्या गर्जनेत नव्हे तर मांजरीच्या आवाजात गर्जना करू लागला तर? होय, तुम्हाला आश्चर्य वाटेल. कदाचित आम्ही जे तुम्हाला सांगतोय, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर सिंहाच्या छावाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सिंहाच्या छावाची गर्जना ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार नाही, तर पोट धरून हसाल. यामागे कारणही तसंच आहे. हा सिंहाचा छावा गर्जना करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र, गर्जना करण्याच्या नादात हा सिंहाचा छावा मांजरीसारखा आवाज काढू लागतो. हे दृश्य फारच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हरीण आपल्यातच धुंदीत, दबा धरून बसलेल्या बिबट्याने चढवला हल्ला

या बेबी लायनने आपल्या क्यूटनेसने सोशल मीडिया यूजर्सची झोप उडवली आहे. खरं तर, तो गर्जना करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या तोंडातून मांजरासारखा आवाज येतो. हे बघून आपोआपच हसू येतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण या बेबी लायनच्या प्रेमात पडले आहेत. सिंह हा एक असा प्राणी आहे, मग तो जंगलात असो किंवा प्राणीसंग्रहालयात. सिंहाची गर्जना ऐकून मोठ्यांनाही घाम फुटतो.

आणखी वाचा : रातोरात स्टार झाला हा बदाम विकणारा व्यक्ती, VIRAL VIDEO मध्ये असं काय आहे ज्याने साऱ्यांनाच वेड लावलंय

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘जंग जारी है, MSP की बारी है’, आंदोलक शेतकऱ्याची लग्नपत्रिका VIRAL

सिंहाची गर्जना ऐकून जंगलातील सर्व प्राण्यांची अवस्था बिकट होते. अशा परिस्थितीत सिंहाच्या छावाच्या डरकाळीच्या रूपात मांजराचा आवाज ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यावर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तो त्याच्या गर्जना कौशल्यात सुधारणा करत आहे.’ सध्या हा व्हिडीओ १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.