आकाशात रंगीबेरंगी फुगे उडताना बघायला कोणाला आवडत नाही. यामुळेच अनेकदा लोक गॅसचे फुगे विकत घेऊन आकाशात सोडतात. मग तो फुगा आकाशात दृष्टीआड होईपर्यंत त्याला पाहत राहणं अनेकांना आवडतं. गॅस फुगे हवेत उडणे सामान्य आहे. पण तुम्ही कधी गॅस फुग्यांसोबत कुणाला उडताना पाहिलंय का? तुम्ही पाहिलं सेल तर या व्हायरल व्हिडीओवर एक नजर नक्की टाका. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी डोळ्यादेखत फुग्यासोबत हवेत उडू लागली. हे पाहून आई मात्र पुरती घाबरून गेली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला आपल्या मुलीला हवेत उडताना पाहून घाबरते. यानंतर आई तिला वाचवण्यासाठी धावताना सुद्धा दिसतेय. पण जेव्हा त्या मुलीला हवेत उडण्यामागचं खरं कारण कळतं तेव्हा तिला धक्काच बसतो. खरं तर, मुलीच्या वडिलांनी फुग्यांचा गुच्छा बांधला होता आणि तो आपल्या इटुकल्या मुलीला बांधून तो घरात दाराच्या आड हवेत सोडला. फुग्यांचा गुच्छा जसा जसा हवेत उडाला तस तशी इटुकली मुलगी सुद्धा हवेत उडू लागली होती. मुलीच्या वाढदिवशी वडिलांनी या लेकीला हा अनोखा अनुभव देण्यासाठी शक्कल लढवली होती.

आणखी वाचा : ‘हा’ प्राणी नेमका आहे तरी कोण? VIRAL VIDEO पाहून विचारात पडले नेटकरी

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL: बाईकवर बसून लॅपटॉपवर काम करत होता, लोकांनी विचारले, “ऑफिसचे काम महत्त्वाचे आहे की जीव?”

फुगे घेऊन हवेत उडणाऱ्या या मुलीच्या व्हिडीओने सोशल मीडियाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. मुलीच्या वाढदिवशी वडिलांची ही अनोखी कल्पना लोकांना आवडू लागली आहे. यामुळेच हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर Tansu YEĞEN नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणतात की काही वेळा विनोद सुद्धा गंभीर घटनांमध्ये बदलतो. कारण ती बाई ज्या प्रकारे घाबरली होती, तिला काहीही होऊ शकतं. त्याचबरोबर अनेक युजर्स वडिलांच्या अनोख्या पद्धतीचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of baby flying in the air reaction of mother went viral prp