एका मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल (HSI)या एनजीओने या अमानुष प्रकाराची गंभीर दखल घेतली असून निर्घृण कृत्य करणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांना 50 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. तसेच, या घटनेबाबत काहीही माहिती असेल तर india@hsi.org या आयडीवर इ-मेल किंवा +91 7674922044 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
रात्रीच्या अंधारात एका मांजरीच्या पिल्लाला लाइटरने जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतात किंवा गवतावर बसलेलं हे पिल्लू आग लागल्यानंतर सैरावैरा पळत सुटतं आणि काही क्षणांमध्येच तडफडत अखेरचा श्वास घेताना या व्हिडिओत दिसतं. व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कुठे ही घटना घडली याबाबतची माहिती मिळालेली नाहीये. पण, हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने एचएसआयच्या निदर्शनास आणून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एचएसआयने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. “एका लहान, असहाय्य मांजरीच्या पिल्लाला जिवंत पेटवण्यात आले. असे कृत्य करणारा व्यक्ती इथेच थांबणार नाही. त्याने आधी किती प्राण्यांसोबत असं कृत्य केलंय ते नंतर कळेल, पण त्यासाठी त्याच्यावर तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे. याबाबतची तक्रार आम्ही केली असून लवकरच तपासाला सुरूवात होईल. जर तुमच्याकडे या घटनेबाबत काहीही माहिती असेल तर india@hsi.org या आयडीवर इ-मेल किंवा +91 7674922044 या नंबरवर कॉल करुन देऊ शकतात”, असे आवाहन ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलचे भारतातील मॅनेजिंग डायरेक्टर आलोकपर्णा सेनगुप्ता यांनी केले आहे.
We were shared a video (by @saarthi_108) of a horrendous cruelty on a kitten with a lighter. We are filing a cyber complaint right away. Our request would be to NOT share the video since the farther it is shared, the more difficult it is to trace the perpetrators. #AnimalCruelty
— HSI/India (@IndiaHSI) July 19, 2020
We have submitted a complaint on @Cybercellindia for tracing this horrific video on #cat Cruelty. We hope that they are able to trace the video and identify the perpetrator. We would like to announce a reward of 50,000 for any information leading to arrest of the perpetrators.
— HSI/India (@IndiaHSI) July 19, 2020
याशिवाय, एचएसआयने साइबर सेलकडेही याबाबतची तक्रार केली असून लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे. ट्विटरवरुन एचएसआयने याबाबत माहिती दिली आहे. तसेच, अमानुष व्हिडिओ शेअर न करण्याची विनंतीही केली आहे.
