असं म्हटलं जातं की हत्ती हा सगळ्यात मायाळू प्राणी आहे. परंतु, ज्यावेळी त्याला राग येतो त्यावेळी तो कशाचाही विचार न करता थेट एखाद्यावर हल्ला चढवतो. सोशल मीडियावरही हत्तीच्या संतापाचे किंवा त्याने घातलेल्या धुडगूसचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण बलाढ्य हत्तीपुढे कुणाचीच चालत नाही. पण तुम्ही कधी दोन हत्तींमधली लढाई पाहिलीय का? सध्या अशाच एका लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोन हत्तींमध्ये लढाई रंगल्यानंतरच काय चित्र असेल, हे पाहण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन हत्तींमध्ये जबरदस्त झुंज पाहायला मिळते. एकमेकांशी भांडण करण्यासोबतच दोन्ही हत्तींनी जंगलात खूप तांडव माजवला आहे. हे धोकादायक दृश्य पाहिल्यानंतर मनात घबराट पसरू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : या ‘छोटी दीपिका’ने सोशल मीडियावर घातला धुमाकुळ, एक्स्प्रेशन्स पाहून Ranveer Singh सुद्धा वेडा झाला

या व्हिडीओमध्ये दोन हत्ती जंगलात कसे समोरासमोर येतात हे दिसतं. दोघांमध्ये एका गोष्टीवरून तीव्र संताप आहे. या दोन्ही हत्तींमध्ये हाणामारी सुरू होते आणि जंगलाचे संपूर्ण दृश्यच पालटतं. बराच वेळ दोघांमध्ये जोरदार भांडण रंगतं. पण शेवटी दोघेही शांत होतात आणि एकमेकांकडे बघत आपापल्या वाटेला जातात.

आणखी वाचा : दारूच्या नशेत या व्यक्तीने सायकलसोबत भलतंच केलं कृत्य, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे बापरे! जंगल सफारी करताना गाडीसमोर चक्क सिंह आला, मग काय झालं ते तुम्हीच बघा

The Girl Who Loves Animals नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘हत्ती विरुद्ध हत्ती.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ किती व्हायरल झाला आहे, हे त्याला मिळालेल्या व्ह्यूजवरून कळू शकतं. हा व्हिडीओ आतापर्यंत ८० लाखांहून अधिक लोकांना पाहिला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of two elephants clashed each other in open field see what happened then omg video went viral prp