आकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच | viral video shows what rainbow looks like from air prp 93 | Loksatta

आकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इंद्रधनुष्य उंच आकाशातून कसं दिसत असेल? हे जाणून घेण्याची तुम्हाला कधी तरी इच्छा झाली असेल.

आकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
(Photo: Reddit/ Damnthatsinteresting)

Rainbow Viral Video : पावसानंतर पावसाइतकंच आल्हाददायक काही असेल तर ते असतं इंद्रधनुष्य. सात रंगामध्ये प्रकाशाचा होणारा खेळ हरेकाच्या नजरेला बांधून ठेवतो. अगदी काही क्षणच दिसलं तरी इंद्रधनुष्य अद्भुत आनंद देऊन जातं. हे इंद्रधनुष्य पावसात, पाऊस पडून गेल्यावर कधीही, कुठंही दिसू शकतं. आकाशात अनेकदा अर्धवर्तुळाकार सप्तरंगी पट्ट्याचा इंद्रधनुष्यही तुम्ही पाहिल असेल ना? शब्दात वर्णन न करता येणाऱ्या या दृश्‍यावर अनेकांनी कविता केल्या आहेत. अनेकांनी आपापल्या पद्धतीने मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. पण हे इंद्रधनुष्य उंच आकाशातून कसं दिसत असेल? हे जाणून घेण्याची तुम्हाला कधी तरी इच्छा झाली असेल. मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आकाशातून इंद्रधनुष्याचे चित्तथरारक दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. निसर्गाच्या या सात रंगानी पृथ्वी सुंदर केलेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावसाळ्यात इंद्रधनुष्याची वाट पाहत असतात. आकाशातून दिसणारे इंद्रधनुष्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला स्कायडायव्हिंग करताना दिसत आहे. हवेत तरंगताना उंच आकाशातून तिला इंद्रधनुष दिसून येतं. यावेळी महिला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून हे सुंदर आणि मनमोहक इंद्रधनुष्य कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. लाल आणि आतील बाजूस जांभळा रंग असलेलं हे इंद्रधनुष पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं.

आणखी वाचा : ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ मृत्यू? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या

हा व्हिडीओ आणखी तुम्ही निरखून पाहिला तर आणखी वेगळ्या रंगांसह एक अस्पष्ट रिंग देखील दिसू शकते. असे इंद्रधनुष्य खूप कमी प्रमाणात दिसून येतात. सात रंगांनी बनलेले इंद्रधनुष्य आपल्याला आकर्षून घेतात.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…

हा व्हिडीओ रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नसल्याने तो वारंवार पाहण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९९ हजार अपवोट्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

इंद्रधनुष्य एका विशिष्ट वातावरणीय अवस्थेत बनतं. (अर्थातच पाऊस आणि सूर्यप्रकाश मिसळून) सूर्य क्षितिजावर ४० डिग्री कोनाच्या आत झुकलेला असला पाहिजे. सूर्य जितका वर जाईल तितकं इंद्रधनुष्य खाली जातं. सूर्य जसजसा पूर्वेकडे झुकत जाईल तशी दिशा महत्त्वाची बनत जाते. आणि हीच समान परिस्थिती सूर्य दुपारी पश्चिमेकडे झुकताना महत्त्वाची बनते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video: कासव पार नवाझुद्दीन सिद्दीकी बनून घेत होतं मृत्यूशी पंगा, कुत्र्याने मानच धरली, मग पुढे जे झालं…

संबंधित बातम्या

रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
Video: कॉलेजमध्ये बेभान नाचू लागल्या ४ तरुणी; ‘या’ अदा पाहताच नेटकरी झाले फिदा, तुम्हीही पाहा
१० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का

व्हिडिओ

ताज्या बातम्या
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प; सर्वात मोठ्या पाईल कॅपच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण
FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
रणवीर सिंगने सर्वांसमोर सिद्धार्थ जाधवला धक्का दिला अन्… पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ