Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तीन तरूणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन तरूणी “जैसा चंद्राचा तुकडा” या सध्या खूप चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तिघींच्या डान्स स्टेप्स अगदी हुबेहुब असून चेहऱ्यावरील हावभावही आकर्षक आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @himani_mestri या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “खूप सुंदर डान्स केलात” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मी तर मधली ला सोडून कुणालाच नाही बघितलं” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप मस्त डान्स पोरींना.” आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “तुमचा डान्स लय भारी आहे.”