पाळीव श्वानांनी आपल्या मालकिणीवर हल्ला करून तिचा जीव घेतल्याची अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना व्हर्जिनियामध्ये घडली आहे. पोलिसांच्या तपासात हा खुलासा करण्यात आला आहे. बैथनी स्टिफन असे या तरुणीचं नाव असून ती २२ वर्षांची होती.
बैथनीला श्वानाचा लळा होता. तिने पिटबुल प्रजातीचे दोन श्वान पाळले होते. ही श्वानाची सर्वात आक्रमक प्रजाती म्हणून ओळखली जाते.
Viral Video : मुंबईच्या किनारी डॉल्फिन्स? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
आपल्या दोन्ही श्वानावर तिचं खूप प्रेम आणि जीव होता. बैथनी नेहमीच श्वानसोबत आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करायची. आपल्या श्वानांसोबत फेरफटका मारण्यासाठी ती घराबाहेर पडली. पण, बराच काळ उलटला तरी ती घरी परतली नव्हती. तेव्हा बैथनीच्या वडिलांनी आजूबाजूच्या भागात शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर बैथनीचा मृतदेह सापडला. यावेळी बैथनीच्या मृतदेहाच्या बाजूला तिचे दोन्ही पाळीव श्वान शांतपणे उभे होते. हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतरच्या तपासात आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली. बैथनीचा जीव हा तिच्या पाळीव श्वानांनीच घेतला होता. पोलिसांच्या तपासात तिच्या मानेवर आणि डोक्यावर श्वानांच्या दातांच्या खोल जखमा आढळल्या. पोलिसांनी जवळपास ६० पुरावे गोळा केले असून त्यात पाळीव श्वानाच्या हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. गेल्या आठवड्यात हे प्रकरण घडलं. सध्या तिचे दोन्ही पाळीव श्वान पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस आणि श्वानांचे तज्ज्ञ त्यांच्या वागण्याचा अधिक अभ्यास करत आहेत. श्वानांनी आपल्या मालकाचा जीव घेण्याची घटना तशी दुर्मिळच म्हणायला हवी. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
Viral Video : चालकाविना ट्रक गिरक्या घेऊ लागला, नियंत्रण मिळवेपर्यंत चालकाच्या नाकीनऊ
व्हर्जिनियातली शोधपत्रकार ख्रिस्टीन यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला. तेव्हा आणखी काही समोर आली. बैथनीनं काही दिवसांपूर्वी आपले दोन्ही श्वान वडिलांच्या घरी ठेवले होते. तिचे वडील या श्वानाची नीट काळजी घेत नव्हते. त्यामुळे बैथनी आठवड्यातून तीन-चार वेळा वडिलांच्या घरी जात असे. जेणेकरून या श्वानांची योग्य देखभाल व्हावी. मात्र, बैथनी सतत त्यांच्यासोबत नसल्याने तिच्याविषयी श्वानांना असलेला लळा कमी होत गेला. त्यामुळेच हा प्रकार घडला, असे प्राणी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.