सोशल मीडियावर कधी, काय आणि कोणता ट्रेंड येईल याचा काही नेम नसतो. सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर सगळीकडेच ‘Dame Tu Cosita’ चॅलेन्ज अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या एलियन्स प्रमाणे नाचून दाखवायचं आणि त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा हे ‘Dame Tu Cosita’ चॅलेन्जचं स्वरुप. आतापर्यंत रोहित शर्मा, जॅकलिन, यामी गौतम, दिव्यांका त्रिपाठी यांनी हे चॅलेन्ज स्विकारलं आहे. या आठवड्यापासून ट्रेंड होत असलेल्या ‘Dame Tu Cosita’ चॅलेन्जमधल्या या विचित्र एलियननं हळूहळू अनेकांना आपल्या तालावर नाचवलं आहे.
सामान्यांपासून ते सेलिब्रिटींना याड लावणारं हे ‘खुळं’ आलं कुठून असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर अर्थात सोशल मीडिया हे त्यामागचं कारण आहे. ‘Dame Tu Cosita’ हे गाणं एल चाँबची निर्मिती आहे. हे स्पॅनिश गाणं असून त्याचा द्वैअर्थ निघतो असं अनेकांनी म्हटलं आहे. अनेकांनी गाण्यातील शब्दांकडे काहीसं दुर्लक्ष करत एलियनच्या तालावर नाचण्याचं चॅलेन्ज स्विकारलं आहे, बघायला सोप्पं पण करायला अवघड असणाऱ्या या डान्स स्टेप्स एकदा तरी करून पाहण्याचा मोह अनेकांना अनावर झाला आहे. त्यामुळे तरुणवर्गात हे चॅलेन्ज विशेष प्रसिद्ध होताना दिसत आहे.
Tried my hand at the #DanceWithAlien challenge #DameTuCoSita on the https://t.co/OoDFtW37JX app! Download the https://t.co/OoDFtW37JX app to try the #DanceWithAlien challenge @musicallyapp pic.twitter.com/fhmwSMHSau
— Rohit Sharma (@ImRo45) March 31, 2018
https://twitter.com/MallikaDua/status/977831548257845248
https://twitter.com/YamiigautamAbhi/status/980883243367976960
Titu Mama teaching the alien how to dance!
Download https://t.co/J4Eg7dqyK6 and check my #DameTuCoSita #DanceWithAlien #DontTeachDaddyHowToFck @musicallyapp pic.twitter.com/xRWiuc8cCO— Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) March 28, 2018