भारतात गाड्यांच्या मागील स्लोगन खूप व्हायरल होतात. वेगवेगळ्या गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून या सगळ्या गाड्या पुण्याच्याच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण कार, ट्रक, बाईकच्या मागेही अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान एका तरुणानं आपल्या बाईकच्या मागे अशी नंबर प्लेट लावलीय की पाहून पोलिसही गोंधळून जातील.

गाडीची नंबर प्लेट ही साधी सरळ असावी. त्यावर कुठल्याही प्रकारची कलाकृती करू नये हा RTO चा नियम आहे. मात्र तरी देखील अनेक लोक आपला स्वॅग दाखवण्यासाठी नियम मोडतात. आणि अजब गजब नंबर प्लेट तयार करतात. आता हेच उदाहरण पाहा ना, या महाशयांनी आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर काय केलंय हे कुणालाच कळत नाहीये. याच नंबर प्लेटचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावर नंबरऐवजी काही चिन्ह दिसत आहेत. जे बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत. या नंबर प्लेटवर काय लिहलंय हे ज्यांचं गणीत चांगलं आहे तेच सांगू शकतील. तुम्हीच बघा आणि सांगा या नंबर प्लेटवर नक्की काय लिहलंय.

पहिल्यांदा ही नंबर प्लेट पाहिली तर कुणीही कन्फ्यूज होईल. असं वाटतं हा एखादा सिक्रेट कोड आहे. पण असं काही नाहीये. हे चिन्ह घड्याळाच्या काट्यांसारखे आहेत. यात काटे वेळ दाखवत आहे. लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला यात ९, ३, ३ आणि ५ नंबर दिसेल. म्हणजे गाडीचा नंबर ९३३५ आहे.

पाहा फोटो

हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या फोटोला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत. एकानं म्हंटलंय, “भारतीयांकडे टॅलेंटची कमी नाही” तर आणखी एकानं, क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलंय.