नव्वदच्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला ‘विनी द पूह’ हे कार्टुन कॅरेक्टर चांगलंच ठावूक असेल. विनीला कोण कसं विसरू शकतं? आजही अनेक मुलींच्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टर्सच्या यादीत विनी असेल. विनीचे किचेन, स्टिकर्स, स्टफ टॉईज पासून एकूण एक छोट्या मोठ्या गोष्टी मुलींकडे उपलब्ध असतील. सर्वात प्रसिद्ध कार्टुन कॅरेक्टरमध्ये पुहची गणना होते. विनीवर आधारित डिन्झेचा ‘ख्रिस्तोफर रॉबीन’ चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. एकीकडे जगभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांची त्यातूनही लहान मुलांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. मात्र चीनमध्ये या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटावर का बंदी घातली आहे हे अद्यापही सांगण्यात आलं नाही. मात्र यामागे चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिंनपिंग असू शकतात अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. गेल्या काही वर्षभरात शी जिंनपिंगची तुलना विनीशी करण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. एकीकडे शी जिंनपिंगचा फोटो तर दुसरीकडे विनीचे फोटो असलेले मीम्स व्हायरल होत आहेत. मीम्स, जीआयएफ च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चीनच्या सोशल मीडियावर शी यांची बदनामी करण्यात आली म्हणूनच २०१७ मध्ये सोशल मीडियावरून हे सर्व मीम्स हटवण्याची जोरदार मोहिम हाती घेण्यात आली. त्यामुळे हा चित्रपट बॅन करण्याचं हेही कारण असू शकतं असा तर्क मांडण्यात आला आहे.

मात्र चीनमध्ये हॉलीवूडचे वर्षांकाठी ३४ चित्रपट प्रदर्शित होतात, त्यातून आता चीन वेगवेगळ्या देशांतील चित्रपट प्रदर्शित करण्याला जास्त प्राधान्य देत आहे म्हणून या चित्रपटाचे प्रदर्शन नाकारलं असं म्हणण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why christopher robin denied release in china old connection with winnie the pooh