डोळ्यात अश्रू... हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO | with her late fathers pic in hand bride walks towards mandap with grandfather viral video prp 93 | Loksatta

डोळ्यात अश्रू… हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO

भावूक करणाऱ्या या नवरीच्या एंट्रीचा हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.

डोळ्यात अश्रू… हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO
(Photo: Instagram/ officialhumansofbombay)

प्रत्येक मुलीसाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. प्रत्येक नवरीला लग्नाच्या दिवशी तिचे कुटुंब विशेषत: आईवडील तिच्यासोबत असावेत, अशी इच्छा असते. पण जर यापैकी एक जरी नसला तरी कसं वाटेल याची कल्पना केली की मनात अगदी भरून येतं. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या दिवंगत वडिलांच्या फोटोसह पाणावलेल्या डोळ्यांनी लग्नाच्या मंडपात प्रवेश करताना दिसतेय. भावूक करणाऱ्या या नवरीच्या एंट्रीचा हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या नवरीचं नाव प्रियांका भाटी असं आहे. हा व्हिडीओ ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. प्रियांका सांगते की, जेव्हा ती फक्त ९ वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांना कर्करोगाने तिच्यापासून दूर नेलं. त्या दिवसांची आठवण करून प्रियांका म्हणते, ‘पप्पा माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे. मला आंबा खूप आवडतो. त्यावेळी घरात नेहमी आंब्याची पेटी असायची. दोन वर्षापूर्वी पप्पाला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर ते अंथरुणावरच राहिले. पण नेहमी आपल्या मुलीबद्दल विचारत राहिले.” लग्नाच्या निमित्ताने वडिलांची आठवण आल्याने नवरीच्या डोळ्यांतून धबधब्यासारखे अश्रू वाहताना दिसत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : साप भिंतीवर असा सरसर चढला की पाहून लोक म्हणाले, “परफेक्ट स्नेक गेम”

वडिलांच्या निधनानंतर आजोबांनी प्रियंकाची काळजी घेतली आणि तिचे पालनपोषण केले. प्रियांका म्हणते, ‘माझे आजोबा खूप कडक होते. मुले त्यांच्या आजूबाजूला खेळायला घाबरत होती. पण वडील गेल्यानंतर तो नरमला. त्याने मला हवे ते सर्व दिले. व्हिडीओमध्ये प्रियंका दादाचा हात धरून मंडपात येताना दिसत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आजोबांनी तरूणीसोबत केला असा जबरदस्त सालसा डान्स, पाहून हैराण व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इथे मरणावर आहे बंदी, ७५ वर्षापासून अंत्यसंस्कार झाले नाहीत तर रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा क्षण काय असतो हे मी समजू शकतो. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी सुपरहिरो असतात. त्यांची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही.” दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले, ‘तुझे वडील तुला पाहत आहेत. दुःखी होऊ नको, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. विशेषत: आजोबा, ज्यांनी तुला पुढे जाण्याचे स्वातंत्र्य दिले.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Optical Illusion : या फोटोमध्ये लपलेला कोल्हा तुम्हाला दिसला का? १० सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्वीकारा

संबंधित बातम्या

गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्…; पाहा Viral Video
गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, १ किलोची किंमत ऐकून नेटकरी म्हणाले “इतक्यात तर…”
ऐ…ऐ माझी चप्पल सोड! महिलेने सापाला चप्पल मारताच साप ती चप्पलच घेऊन पळाला, पाहा Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
कर्तव्यपालनास प्राधान्य द्या!; संविधानदिनी पंतप्रधान मोदींचे आवाहन
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार