एका महिलेला आपल्या घराच्या बागेमध्ये दोन तोंडाचा अत्यंत दुर्मिळ असा साप आढळला आहे. हा साप तिने तिथल्या एका संग्रहालयाला भेट दिला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या कुत्र्याला दोन तोंडाचे सापाचे पिल्लू बागेमध्ये आढळले होते. त्यानंतर त्याने या पिल्लाला पकडण्याचा देखील प्रयत्न केला. उत्सुकतेपोटी या महिलेने बागेत नजर फिरवली असताना तिला दोन तोंडाचा दुर्मिळ  साप आढळला. या महिलेने सापाचे हे पिल्लू कॅमरुन पार्क संग्रहालयाला भेट दिले आहे. या पिल्लाला ९० दिवसांच्या निरिक्षणासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर लोकांना या सापाला पाहता येणार आहे. अशा प्रकारे दोन डोके असलेले साप जंगलात अनेकदा आढळले आहेत. पण दुर्देव म्हणजे अशा सापांचा लगेच मृत्यू होतो. या पिल्लाबाबत असेच होऊ नये म्हणून याला विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सध्या हा दुर्मिळ साप चांगल्या स्थितीत आहे. पुढच्या तीन महिन्यांत जर सापचे हे पिल्लू जिवंत राहिले तर ते अनेक लोकांना पाहायला मिळेल त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. फेसबुक मार्फत संग्रहालय प्रशासन या सापाची माहिती स्थानिकांना देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman found a two headed baby snake