चीनच्या सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात एका फोटाची तूफान चर्चा झाली होती. आता हाच फोटो जगभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरूणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या गळ्यात पट्टा अडकवला आणि त्याला भर रस्त्यात फिरवले. तिच्या सोबत असलेला तरुण हा गुडघ्यावर कुत्र्याप्रमाणे अगदी मुकाट्याने रेंगाळत चालला होता. हा संपूर्ण प्रकार बघण्यासाठी इतकी गर्दी जमली की रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊन ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले.
चीनच्या फुजिआन प्रांतात हा संपूर्ण प्रकार घडला. निळ्या कपड्यातील एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा अडकवून त्याला भर रस्त्यात फिरवत होती. तिचा बॉयफ्रेंड गुडघ्यावर बघ्याच्या नजरा चुकवत तिच्या मागे मागे चालला होता. सुरूवातील एका दोघांनी हा प्रकार पाहिला नंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी रस्त्यावर काही मिनिटांतच बघ्यांची गर्दी जमली आणि फुजिआनच्या रस्त्यावर या कपल्समुळे चक्क वाहतुकी कोंडी झाली. इतकेच नाही तर बघ्यांना हा माझा कुत्रा आहे असेही उद्धट उत्तर या तरुणीने दिले. मात्र ही तरूणी त्याला कुत्र्यासारखे का वागवत होती याचे कारण मात्र कळले नाही. दरम्यान चीनच्या ‘वीबो’ या सोशल मीडियासाईटवर हा फोटो व्हायरल झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2016 रोजी प्रकाशित
VIRAL : बॉयफ्रेंडच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून त्याला रस्त्यात फिरवले
हा माझा कुत्रा आहे, गर्लफ्रेंडचे बघ्यांना उत्तर
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-09-2016 at 17:24 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman took her man on streets like a dog