धोनीची चिमुकली धोनीइतकीच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी झिवाच्या नावनं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं. आठवड्याभराच्या आतच चिमुकल्या झिवाच्या फॉलोअर्सची संख्या ५९ हजारांच्यावर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भक्तीगीत गातानाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. भक्तीगीत गाणाऱ्या निरागस झिवाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली.

जाणून घ्या ‘हॅलोविन नाईट’मध्ये भोपळ्याला सर्वाधिक महत्त्व का असतं?

IRCTC ने तिकीट आरक्षित करण्याचे बदललेले नियम तुम्हाला माहितीये?

मल्याळम भाषेतील श्रीकृष्णाचं भक्तीगीत गाणाऱ्या झिवाचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तिचे गाणं ऐकून केरळमधल्या श्रीकृष्ण मंदिराच्या समितीनं झिवाला श्रीकृष्णउत्सवासाठी आमंत्रण पाठलं आहे. १४ जानेवारीपासून अलाप्पुझा जिल्ह्यातील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण उत्सव सुरू होणार आहे, यात झिवानंदेखील सहभागी व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे, म्हणूनच त्यांनी झिवाला आमंत्रण पाठवलं आहे.