सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. या वन्यप्राणी आणि अजगरांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. अजगराच्या जीवनशैलीबाबत कायमच उत्सुकता असते. त्यामुळे अजगराचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसणारा अजगर काळा, पिवळा नसून चक्क इंद्रधनुष्यातल्या सप्तरंगाचा दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी या अजगराबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर या इंद्रधनुषी अजगची जोरदार चर्चा रंगली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती अजगराबरोबर बसला आहे. त्याने हातात हा इंद्रधनुषी अजगर धरलेला दिसत आहे. असा अजगर तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल. इंद्रधनुषी अजगराला या व्यक्तीने आपल्या कुशीत घेऊन त्याला ओंजारत गोंजारताना दिसतोय. आतापर्यंत अजगराचे व्हिडीओ पाहताना मनात भीती वाटत असे. पण या अजगराचा व्हिडीओ पाहताना त्याच्या सौंदर्याने लोक घायाळ होत आहे. असा अजगर पहिल्यांदा पाहत असल्याच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स अजगराच्या इंद्रधनुष्याच्या रंगाविषयी चर्चा करत आहेत.

हा व्हिडीओ jayprehistoricpets नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचं नाव जे ब्रेवर असून ते कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झूचे फाऊंडर आहेत. जगातील सर्वात सुंदर अजगरांपैकी एक हा अजगर आहे. जेव्हा या अजगरावर सूर्याची किरणं पडतात तेव्हा त्या अजगराला पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. हा अजगर सर्वात चांगला अजगर आहे, म्हणजे त्याच्यापासून फार धोका नाही.

हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख २८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. एका युजरने लिहिले आहे, “सुंदर आणि अप्रतिम तर दुसर्‍या यूजरने कमेंट केली आहे, “असा अजगर सुद्धा असतो का? मी हे पहिल्यांदाच पाहिलं.” याशिवाय अनेकांनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर अनेक लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत.