चैत्राची नवी पालवी फुटू लागली की वेध लागतात ते आपल्या नववर्षांरंभाचे अर्थात गुढीपाडव्याचे! चत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा सण आपण सर्वच मोठय़ा आनंदाने, उत्साहाने साजरा करतो. दाराला छान, टपोऱ्या केशरी गोंडय़ांचं तोरण लावतो, हॉलच्या बाल्कनीत छोटीशी का होईना पण गुढी उभारतो आणि आप्त, मित्रमंडळींच्या सान्निध्यात सुग्रास जेवणाच्या संगतीने नववर्षांची सुरेख सुरुवात करतो. मग अशा या मंगलदिनी आपलं घरसुद्धा खास मस्त सजलेलं हवं, नाही का? मात्र, घर सजवण्यासाठी
कोणताही सण असो किंवा शुभ कार्य असो फुलांशिवाय त्याला पूर्णत्व नाही. गुढीपाडव्याला आपण ताज्या, रसरशीत गोंडय़ांच्या फुलांचं तोरण बांधतोच. पण याबरोबरच इतर ताज्या फुलांनीसुद्धा घर सजवता येतं. आज बाजारात फुलदाण्यांमध्ये वैविध्य आहे. सिरॅमिक, टेराकोटा, लाकूड यांपासून बनवलेल्या फुलदाण्या आता सर्रास कोणत्याही गिफ्ट शॉप्समध्ये, मॉल्स, शिल्प प्रदर्शन यातून पाहायला मिळतात. ताजी फुलं
घराचा दर्शनी भाग म्हणजे अर्थातच हॉल आणि या हॉलचं आकर्षण असतं ते म्हणजे इथे ठेवलेल्या शोभेच्या वस्तू. या गुढीपाडव्याला तुम्हाला तुमच्या वॉल युनिटमध्ये हटके वस्तू ठेवायच्या असतील तर काचेच्या किंवा क्रिस्टलच्या अप्रतिम शोभेच्या वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. राजहंस जोडी, अन्य पक्ष्यांची जोडी, डािन्सग कपल, घोडागाडी याबरोबरच देवतांच्या मूर्त्यांसुद्धा यामध्ये बघायला मिळतात. हे थोडंसं महागडं काम असलं तरी दिसायला मात्र एकदम झक्कास आहे. हॉलचा एखादा भाग, कोपरा किंवा वॉल युनिट अधिक आकर्षक करायचं असेल तर यातली एखादी वस्तू तरी या ठिकाणी स्थानापन्न करायचं.
याशिवाय पडदे, कुशन्स यात वैविध्य आणून तुम्ही घराचा कायापालट करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात पडदे घेताना ते शक्यतो फिक्क्या रंगांमधले, नजरेला सुखावह होतील असे घ्यावेत. जेणेकरून उन्हाची
र्दीज्, कारपेट्स हा सजावटीतला हुकमी एक्का आहे. त्याला विसरून चालणारच नाही. आकाराने छोटय़ा र्दीज् हॉलच्या मध्यभागी बठकीच्या समोर मांडता येईल. काही मॉल्समध्ये र्दीज्, कारपेट्स अगदी वाजवी किमतीत मिळतात. बरं या वस्तू अशा आहेत की ज्या तुम्हाला नेहमी वापरायच्या नसल्या तर खास समारंभाला वापरू शकता. म्हणजे सजावटीतलं नावीन्य तुम्हाला टिकवता येतं.
या सर्व शोभेच्या वस्तू खिशाला भली मोठी कात्री लावणाऱ्या नसल्याने त्यांचा वापर करून घराला सौंदर्यपूर्ण वेगळेपणा निश्चितच देता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2013 रोजी प्रकाशित
घर सजले सजले…
सणासुदीला घर सुरेख सजलेलं असेल तर आनंदात आणखीच भर पडते. त्यातही जर गुढीपाडव्यासारखा सण असेल तर घराला नवी, ताजी झळाळी ही द्यायलाच हवी. साडेतीन शुभ मुहूर्तापकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी घर मस्त सजवून नववर्षांची सुरेख सुरुवात करा..

First published on: 06-04-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decorate home