* इनाम वर्ग ६ बच्या वतन जमिनींचे खरेदीखत कुलमुखत्यारपत्राद्वारे होते का? तसेच या जमिनीचा ताबा कुलमुखत्यारपत्राने घेता येतो का?
– वाय. बी. गायकवाड, पुणे
* जमीन खरेदी विक्री व्यवहारात रोख स्वरूपात नोंदणी दस्तावर किती रोख रक्कम दिली जाऊ शकते?
* आपल्या प्रश्नाचा रोख स्पष्ट होत नाही. किंबहुना आपली शंका काय आहे याचे नीट आकलन आपल्या प्रश्नामधून होत नाही. तरीसुद्धा काही गोष्टी गृहीत धरून आपल्या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल.
१) मोबदला द्यायची रक्कम गृहीत धरून आपण खरेदी विक्रीमधील ठरलेला मोबदला संपूर्णपण सुद्धा रोख स्वरूपात देऊ शकता किंवा रोख व किती टक्के धनादेशाने पैसे द्यावेत असे कोणतेही बंधन कायद्यामध्ये दर्शवण्यात आलेले नाही, हे लक्षात घ्यावे. २) उधार वा गहाण समजून विकत घेणाऱ्या व्यक्तीला द्यायची रक्कम गृहीत धरून अशा नोंदणीकृत कराराची पूर्ण प्रक्रिया पुरी होईपर्यंत त्यावर कर्ज दिले जात नाही. अथवा तो दस्तऐवज खाजगीरीत्या गहाण म्हणून स्वीकारला जात नाही, परंतु एखाद्याने अशा कागदपत्रावर त्या त्या ठिकाणाचे बाजारभाव लक्षात घेऊन त्यावर किती रक्कम रोख स्वरूपात द्यायची हा निर्णय ज्याचा त्याने घेणेच योग्य होईल. वित्तीय संस्था अशा कागदपत्रांवर कर्ज देतात, मात्र त्यानंतर एकदा का त्या फ्लॅटवर, शॉपवर, गाळा / गोडाऊन, दुकान आदी तत्सम मालमत्तेचे पूर्ण झालेले कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवतात.
* एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत जी बहीण सहहिस्सेदार आहे ती जमीन वहिवाटण्यास अडचण निर्माण करत आहे, तर याबाबत नक्की काय करावे?
* खरे तर एकत्र कुटुंब पद्धतीत जो कर्ता असतो त्याला एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेसबंधी सर्व कुटुंबाचे हित लक्षात ठेवून कोणताही निर्णय घेता येतो. उदा. जमीन विकणे, गहाण ठेवणे, खटले भरणे, इ. त्यामुळे ती वहिवाटीस कोणती अडचण निर्माण करते आहे हे लक्षात येत नाही. तरीसुद्धा अशी अडचण ती करत असेल तर तिला हिस्सा विभक्त करून देणेच इष्ट होय.