अ‍ॅड. तन्मय केतकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, हे आपण अगदी प्राथमिक शाळेपासून शिकत आलेलो आहोत. एकेका टप्प्यावर उत्क्रांत होत होत मानवाचा एकसंध समाज होता तो विविध धर्म, जाती, भाषा अशा निकषांवर विभागला गेला. गेल्या काही वर्षांमध्ये तर ही विभागणी अधिकाधिक तीव्रतेने आणि जाहीरपणे जाणवायला लागलेली आहे.विविध ठिकाणी एकेका समाजातील लोकांनी कळपाने राहणे आणि इतर समाजातील लोकांना मालमत्ता विक्री न करणे हे प्रकार हल्ली राजरोस सुरू आहेत. मालमत्ता विक्रीच्या जाहिराती देतानासुद्धा जात, धर्म, भाषा, आहार पद्धती या आधारे ठरावीक लोकांनाच मालमत्ता विक्री केली जाईल असे स्पष्ट लिहिण्यात येते. त्याव्यतिरिक्त इतर धर्म, भाषा, जात, आहारपद्धतीच्या लोकांना विक्रीस आणि खरेदीस केवळ त्याच कारणास्त्व स्पष्ट मनाई करण्यात येते.

या मुद्दय़ाचा विचार करताना कायदेशीर आणि सामाजिक दोन्ही अंगांनी विचार होणे आवश्यक आहे. प्रथमत: कायद्याचा विचार करता कोणत्याही व्यक्तीस केवळ त्याच्या धर्म, जात, भाषा, आहारपद्धती यावरून मालमत्ता विक्री नाकारणे गैर आहे आणि त्याविरोधात यथोचित फौजदारी आणि दिवाणी कायदेशीर कारवाई होऊ शकते. अर्थात ही कायदेशीर लढाई तशी सोप्पी नाही, कारण अशा जाहिरातींवर बंदी घातली तर असे प्रकार छुपेपणाने होतच राहतील. आपल्याकडे माणसाच्या नावाने, आडनावाने त्याच्याबद्दल प्राथमिक माहिती जाहीर होत असते. या माहितीच्या आधारे धर्म, जात, भाषा, आहारपद्ध च्या आधारावर नाकारली जाईल. एखाद्याने आपली मालमत्ता कोणास विकावी आणि कोणास नाही यावर कायदेशीर ती हे मूळ मुद्दे जाहीर न करता मालमत्ता विक्री व्यावहारिक किंवा स्वेच्छाधिकारा नियंत्रण आणणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे आव्हान पेलणे तसे सोप्पे नाही.

दुसरा आणि जास्त महत्त्वाचा मुद्दा

आहे तो म्हणजे सामाजिक. विविधतेत एकतेच्या आपण कितीही गप्पा केल्या तरी आपल्याकडे आजही धार्मिक, जातीय, भाषिक आणि आहाराविषयी भावना सदैव विशेष महत्त्वाच्या राहिलेल्या आहेतच. गेल्या काही काळापासून त्या भावनांची तीव्रता वाढलेलीच आहे. अशा वेळेस आतल्या आत संकोच होत जाणाऱ्या समाजाला जास्तीतजास्त सामावेशक करण्याचे काम कायद्यापेक्षा प्रबोधनच अधिक करू शकेल. दुर्दैवाने तसे झाले नाही आणि हा सामाजिक संकोच असाच होत राहिला तर आपल्या समाजाची धर्म, भाषा, जात, पोटजाती, आहारपद्धती या आधारांवर असंख्य शकले होतील आणि विविधतेत एकतेच्या नुसत्या गप्पा उरतील.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indirect prohibition of purchase of property property sale amy