पुस्तकप्रेमींसाठी तर या जागा म्हणजे पर्वणीच आहेत. अशा लोकांच्या वास्तूतील कॉर्नर्स पुस्तकांच्या शेल्फनी मस्त सजवता येतात. यातून त्यांचं पुस्तकप्रेमही दिसून येतं आणि कॉर्नर्सचा सही उपयोगही होतो. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी अशी रचना खूप सुरेख दिसते. या ठिकाणी पुस्तकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
वैयक्तिक खोल्यांमधले कॉर्नर्स, कॉलम्स आपल्या आवडीनिवडींचा विचार करून उत्तमरीत्या सजवू शकतो. पुस्तकं, स्वत: काढलेले फोटोज्, पेंटिंग्ज, रूम मोठी असेल तर एखादं छोटेखानी कपाट, संगीताची आवड असेल तर आवडीच्या सीडीज्, तबला-डग्ग्याची छोटी प्रतिकृती, तसंच अॅण्टिक वस्तू, नृत्याची आवड असेल तर त्या संदर्भातल्या वस्तू अशा नानाविध कल्पनांनी ही जागा आपण सजवू शकतो. तज्ज्ञ व्यक्तीकडून या जागा कशा सजवाव्या, या संदर्भातल्या कल्पना जाणून घ्याव्यात. अनेक पर्यायांतून आपल्या आवडीचा पर्याय निवडून या दुर्लक्षित जागांना एक अर्थपूर्ण लुक देता येतो.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
मेकओव्हर : कॉर्नर्स
इंटीरिअर डिझायिनगचं काम सुरू करण्याआधी प्लॅिनग आणि डिझायिनगची बठक पक्की असावीच लागते, पण याबरोबरच इतरही अनेक गोष्टी, शक्यता विचारात घ्याव्या लागतात. एखाद्या वास्तूत (घर, ऑफिस, दुकान वगरे) काम सुरू केल्यावर काही जागा विशेषत: कॉर्नर्स, बीम्स, कॉलम्स नजरेआड करून चालत नाही.

First published on: 02-03-2013 at 01:04 IST
TOPICSमेकओव्हर
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makeover corners in the room