मालिको-सिनेमा क रताना विशिष्ट व्यक्तिरेखांसाठी अभिनेत्री ठरावीक दागिन्यांचा साज चढवतात. खऱ्या आयुष्यात मात्र दागिन्यांविषयीच्या त्यांच्या व्याख्या कोहीशा वेगळ्या आहेत. सोनं असो किंवा डायमंड प्रत्येक दागिन्याची खासियत वेगळीच असते, असं त्यांचं म्हणणं. या वैशिष्टय़ांसह या अभिनेत्री त्यांच्या आवडत्या दागिन्यांविषयी सांगताहेत त्यांच्याच शब्दांत..
ठुशी, चिंचपेटी प्रिय
– ऋतुजा बागवे
झुमको गिरा रे..
झुमक्यांमध्येही वेगवेगळे प्रकोर आहेत. फ क्त मोत्यांचे आणि सोनं- मोतीमिश्रित असे झुमके . मोत्यांचे झुमके जास्त सुंदर दिसतात. पारंपरिक दागिन्यांमध्ये आता वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. दागिन्यांचा आकोर, धातू, स्टाइल यात बदल के ले जातात. पण मला वाटतं, की पारंपरिक दागिना जसा आहे तसाच घालावा. त्यातच खरं सौंदर्य आहे. प्रयोग के लेल्या झुमक्यांमध्ये तितकोसा गोडवा वाटत नाही. पारंपरिक झुमके घातले की चेहऱ्यालाही एक वेगळाच गोडवा येतो. झुमक्यानंतर मला दागिन्यांमध्ये तोडे खूप आवडतात. त्यातसुद्धा मला सोन्याची झालर असलेले मोत्यांचे तोडे आवडतात. मला एकू णच पारंपरिक दागिन्यांमध्ये मोत्यांचं वेड आहे. त्यामुळे मोत्यांनाच मी अनेक दा प्राधान्य देत असते. मोती असतात फोर गोड. टपोरे मोती तर आक र्षित क रतात. पांढरे, पिवळसर, पाणीदार असे सगळ्याच रंगांचे मोती मला खूप आवडतात. आणि त्यातले दागिने तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.-
पूजा सावंत
पैंजण माझ्या आवडीचे
– सुचित्रा बांदेकर