लहानपणी अंताक्षरी, डम्बशेराज यांसारखा अजून एक खेळ आपण खेळत असू, आठवतोय का? तो होता ‘कॅच द वर्ड’. गाण्यातल्या एखाद्या शब्दाला पकडून समोरच्या टीमने दुसरं गाणं गायचं असायचं. या खेळत प्यार, दिल, चांद असे काही ठरावीक शब्द असत, ज्यावर पुष्कळ गाणी असतात हे आपल्याला माहीत असायचं. मग प्रत्येक गाण्यातील ते शब्द शोधायची धडपड प्रत्येकाची असायची. याच समूहातील एक शब्द आहे तो म्हणजे ‘आँखें’ म्हणजेच डोळे.
तरुणीचे डोळे हा कित्येकांचा विकपॉइंट. कॉलेजकट्टा असो वा ऑफिस, मित्रांचा ग्रुप असो वा ट्रेनमधली गर्दी, तिच्या त्या एका नजरेसाठी सगळे आसुसलेले असतात. बरं, हे सगळं मुलीनांही ठाऊक असतं. त्यामुळेच तर आपल्या डोळ्यांची खास काळजी त्या घेत असतात. आणि कुठेही बाहेर जाताना प्रथम डोळ्यात काजळ किंवा लायनर लावूनच बाहेर पडतात. आता तर आय मेकअपवर जास्त लक्ष दिलं जातं. मग
बाजारातही लॅक्मे, ओरिफ्लेम, मेब्लिन अशा कित्येक ब्रँड्सनी त्यांच्या मेकअप कीटमध्ये आय मेकअपची एक मोठी रेंज उपलब्ध करून दिलेली आहे. पण कोणताही आय मेकअप करण्यापूर्वी सध्या कोणते ट्रेंड चालू आहेत हे पाहणे सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे सध्याच्या आय मेकअप ट्रेंड्सवर एक झलक.
सिंगल फोकस :
फक्त आय मेकअपच नाही तर कोणताही मेकअप करताना एका गोष्टीची काळजी घ्या, की डोळे आणि ओठ यातील एकाला फोकस द्या. डोळ्यात भडक मेकअप आणि ओठांवर तितकीच भडक लिपस्टिक लावल्यास चेहरा बटबटीत वाटू शकतो. असेच आय मेकअपवर भर देताना इतकं लक्ष द्या, की त्या मेकअपच्या वजनाने तुमच्या पापण्या बंद नाही होणार. शक्यतो एक किंवा दोन शेड्सच्या आयशॅडो पुरेशा असतात. ‘अति तिथे माती’ हा मंत्र नेहमी लक्षात असू द्या. अशा वेळी लिपस्टिक शक्यतो न्यूड शेडमध्ये वापरावी. जेणेकरून संपूर्ण फोकस डोळ्यांवर जाईल. जर तुम्ही हेव्ही आय मेकअपचे शौकीन नसाल तर आय मेकअप न्यूट्रल ठेवून लिपस्टिक मात्र थोडी भडक रंगाची वापरू शकता. त्यानेही तुमच्या स्वच्छ, टपोऱ्या डोळ्यांवर फोकस ओढला जातो. सध्या बाजारात रेव्हलॉनसारखे काही ब्रँड्स सिंगल आयश्ॉडो देण्याऐवजी दोन किंवा तीन आयशॅडोजचा सेट देतात. त्यातील रंग एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे असतात. त्यातील सेट तुम्ही निवडू शकता.
शिमिरग आइज :
सध्या बाजारात अनेक ग्लिटिरग आयशॅडोज आले आहेत. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही तेही वापरू शकता. मात्र ग्लिटिरग आयशॅडोज वापरताना लायनर किंवा काजल वापरणे टाळावे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ग्लिटिरग आयशॅडोजपकी काहींना डार्क बेसकलर असतो, तर काहींना बेस कलर न्यूड असतो. तुमच्या कपडय़ांच्या शेडनुसार त्यातील आयशॅडो तुम्ही निवडू शकता. आय मेकअप जरी इन ट्रेंड असला तरी काही कोणता मेकअप करावा, तुमच्या डोळ्यांना आणि स्कीनला कोणते शेड्स सूट होतील, याची माहिती असणे कधीही उत्तम. त्यामुळे त्यानुसार मेकअप करावा.
जस्ट वन स्ट्रोक :
ड्रामा इन आय :
थोडा ड्रामा तुमच्या डोळ्यात आणू शकता. संपूर्ण आय मेकअपऐवजी दोन रंगांचे लायनर एकत्र लावून किंवा पापण्यांवर लायनरने कॅटआय लुक तुम्ही देऊ शकता. लायनर पापण्यांच्या थोडे बाहेर खेचून रेट्रो लुकसुद्धा देऊ शकता. पण यासाठी लायनरच्या स्ट्रोकवर तुमची पकड असायला हवी. दोन्ही डोळ्यांतला स्ट्रोक समान हवा. त्यानुसार तुम्ही पेन्सिल किंवा जेल लायनर निवडू शकता. पापणीच्या खालच्या बाजूला लायनर लावण्याऐवजी वरच्या बाजूलाही लायनर लावून एक वेगळा लुक मिळतो किंवा लायनर आणि काजलशिवाय केवळ न्यूड शेडमध्ये आयश्ॉडो वापरूनही मस्त लुक मिळवता येतो.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2014 रोजी प्रकाशित
आय मेकअपचे बोल्ड ट्रेंड्स
लहानपणी अंताक्षरी, डम्बशेराज यांसारखा अजून एक खेळ आपण खेळत असू, आठवतोय का? तो होता ‘कॅच द वर्ड’. गाण्यातल्या एखाद्या शब्दाला पकडून समोरच्या टीमने दुसरं गाणं गायचं असायचं.

First published on: 02-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bold trends of eyes makeup