सेलेब्रिटींच्या नावानं ब्रॅण्डिंग करण्याची पद्धत हॉलीवूडमध्ये नवी नाही.आपल्याकडे मात्र सेलेब्रिटी जाहिरातींमधूनच दिसतात. बिपाशा, सुझॅन आणि मलाईकाच्या नावानं आपल्याकडेही नुकतंच सेलेब्रिटी ब्रॅण्डिंग सुरू झालंय आणि त्यामागची कल्पना आहे, प्रीता सुखटणकर या उद्योजिकेची. ‘द लेबल कॉर्प’ या इ-कॉमर्स ब्रॅण्डमागचा मराठमोळा चेहरा.
या ई-कॉमर्सच्या जगात प्रीता सुखटणकर हे एक मराठी नाव सध्या बरंच गाजतंय. २०१३ साली सुरू झालेल्या ‘द लेबल कॉर्प’ ही प्रीताची बॅ्रण्ड आयडिया. या ब्रॅण्डअंतर्गत तिने तीन वेगवेगळी लेबल अर्थात ब्रॅण्ड्स डेव्हलप केले आहेत. त्यातील एक होम डेकॉरचे आहे, दुसरे स्टाइल लेबल, तर तिसरे अॅक्सेसरीजचे लेबल आहे. या तिन्ही लेबल्सची खासियत म्हणजे प्रत्येक लेबलला प्रीताने एकेका सेलेब्रिटीचा चेहरा दिला आहे. तो ब्रॅण्ड त्या सेलेब्रिटीच्या नावाने ओळखला जातोय. यातील होम डेकॉरवर आधारित ‘द होम लेबल’ला सुझॅन खान रोशनचा चेहरा आहे. सुझॅनची इंटिरिअर पाश्र्वभूमी लक्षात घेऊन होम लेबलसाठी सुझॅन होम डेकॉरचे पर्याय उपलब्ध आहेत. तर स्टाइलवर आधारित ‘कॉर्सेट लेबल’साठी मलाइका अरोरा-खानची निवड करण्यात आली आहे.
या लेबलमध्ये तुमच्या दैनंदिन वापरापासून ते पार्टीवेअपर्यंत ड्रेसिंगचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. बिपाशा बासूकडे अॅक्सेसरीजच्या ‘द ट्रंक लेबल’ची जबाबदारी आहे, ज्यामध्ये बॅग्सपासून ते नेकलेसपर्यंत विविध अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
याबद्दल आधिक माहिती देताना प्रीता सांगते, ‘सध्या जमाना ‘टेस्ट मेकर्स’चा आहे. टेस्ट मेकर म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला तुमच्या शॉपिंगमध्ये मार्गदर्शन करू शकेल. कित्येकदा तुम्ही शॉपिंग करीत असताना गोंधळता, नक्की काय खरेदी करावे हे कळत नाही. अशा वेळी टेस्टमेकर तुमच्या मदतीस येतो. यासाठी प्रत्येक ब्रॅण्डला योग्य चेहरा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा मी होम डेकॉरचा विचार केला तेव्हा सुझॅनशिवाय इतर कोणताही चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला नाही. तिच्या इंटिरिअर क्षेत्रातील कौशल्याबद्दल सर्वानाच कल्पना आहे. मलाइका तिच्या इझी आणि कम्फर्टेबल स्टाइलसाठी ओळखली जाते. त्यामुळे स्टाइल लेबलसाठी तिचे नाव समोर आले आणि अॅक्सेसरीजचा विचार करता बिपाशापेक्षा उत्तम नाव कोणते असूच शकत नाही. त्यामुळे या तिघींची निवड मी केली आणि त्यांनाही ही संकल्पना आवडली.’
या साइटचे स्वरूप केवळ शॉपिंग साइट न ठेवता त्याला ‘एडिटोरियल ई-कॉमर्स’ साइटचे स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रीताने केला आहे. एडिटोरिअल ई-कॉमर्स साइटचे स्वरूप एखाद्या मॅगझिनसारखे असते. या वेबसाइट्सवर तुम्हाला वेगवेगळ्या ब्लॉग्सच्या माध्यमातून स्टाइलविषयक धडे दिले जातात, तुम्हाला केवळ वस्तू आणि किमती दिसत नाहीत, तर त्यांना स्टाइल करण्याच्या विविध पद्धतींची माहिती पण दिली जाते. ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधला जातो आणि अशा प्रकारचा प्रयोग करणारी प्रीताची वेबसाइट भारतातील पहिली वेबसाइट असल्याचे तिने सांगितले.
सेलेब्रिटीज आणि त्यांची ब्रॅण्ड एण्डॉर्समेंट आपल्यासाठी नवीन नाही. आजच्या घडीला सर्वच आघाडीचे कलाकार कोणत्या ना कोणत्या ब्रॅण्डचा पुरस्कार करताना दिसतात. मग यात आणि लेबल कॉर्पमध्ये
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2014 रोजी प्रकाशित
सेलेब्रिटी ब्रॅण्डिंग
सेलेब्रिटींच्या नावानं ब्रॅण्डिंग करण्याची पद्धत हॉलीवूडमध्ये नवी नाही.आपल्याकडे मात्र सेलेब्रिटी जाहिरातींमधूनच दिसतात. बिपाशा, सुझॅन आणि मलाईकाच्या नावानं आपल्याकडेही नुकतंच

First published on: 04-07-2014 at 04:47 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity branding