इव्हनिंग पार्टीमध्ये लाऊड मेकअप आणि ग्लॅमरस लुक बॉलीवूड सेलेब्रिटीज जितक्या सहजतेने कॅरी करतात, तितक्याच सहजतेने त्या दिवसाच्या समारंभासाठी तयार होतात. सकाळचा लुक रात्रीपेक्षा कमी ग्लॅमरस असतो म्हणून त्यांची छाप पडत नाही असं अजिबात नाही.
सोनम कपूर : स्टाइलच्या बाबतीत सोनम चुकणं शक्यच नाही. सहसा दिवसा एखाद्या कार्यक्रमाला डार्क ड्रेस घालणं नायिका टाळतात. पण डार्क नेव्ही ड्रेस सोनमने उत्तमरीत्या कॅरी केला आहे. सोबतचा लाल रंग या ड्रेसला गर्ली लुक देतोय.
जुही चावला : जुही तिच्या सिम्पल पण एलिंगट स्टाइलसाठी ओळखली जाते. या पिवळ्या ड्रेसमध्येही तिने तिची सिप्लिसिटी सांभाळली आहे. कॉटनच्या प्लेन ड्रेससोबत मोत्यांची माळ जुळून आली आहे. लूझ फिट आणि ड्रॉप हेमलाइन ड्रेस कुठेही ढगाळ वाटणार नाही याची तिने काळजी घेतली आहे.