जॅकलिन फर्नाडिस ही श्रीलंकन ब्युटी तिच्या वेस्टर्न स्टाईलमध्ये पास होतेच, पण आज इंडियन लूकमध्येही तिने पैकीच्या पैकी मार्क मिळविले आहेत. व्हाईट घागऱ्यावर जांभळ्या रंगाचे हायलाईट आणि सोनेरी रंगाची डिटेलिंग अगदी जुळून आले आहे. कानातले झुमके तिचा लुक पूर्ण करतात.
श्रद्धा कपूर सहसा स्टाइलच्या बाबतीत चुकत नाही. पण तिचा हा इंडियन लुक काहीसा चुकला आहे. गडद अबोली रंगाचा अनारकली आणि त्यावरचा मॅचिंग दुपट्टा हा लुक जमून आलेला नाही. नेटच्या एम्ब्रॉयडरी अनारकलीमध्ये साधलेला ट्रान्सपरंट लुक यावेळी फसला आहे.