|| गायत्री हसबनीस
गेल्या दोन वर्षांत डिजिटल शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार जोरदार झाला आहे, त्यातून झालेले नवीन बदल आणि तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण पध्दतीत झपाट्याने सुधारणा केली. यापुढेही डिजिटल शिक्षणाशी ओढ अशीच राहणार यात काहीच शंका नाही. त्यामुळे येत्या काळात काय नव्या गोष्टी डिजिटल शिक्षण पध्दतीत पाहायला मिळणार याबाबत खुद्द तज्ज्ञांशी बोलून जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
आता एभ्ेकचा जमाना आहे त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणजे फळा आणि खडू पूर्णत: डिजिटल झाले आहेत. विद्यार्थी-शिक्षक आणि एकूणच शिक्षणचक्र डिजिटली जोडलं गेलं आहे. ‘‘२०२२ या वर्षात आपण कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बदल शिक्षण क्षेत्रात पाहणार आहोत. मशीन लर्निंग हे एक मोठे तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. ‘एभ्ेक’ म्हणजे एज्युकेशन टेक्नोलॉजीच्या विस्तारामुळे बरेच ऑनलाइन अॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉम्र्स विकसित झाले आहेत. याचा वापर या वर्षी सगळ्या एभ्ेक स्टार्टअप्समध्ये होईल. येत्या काळात डिजिटल शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी अधिक स्वतंत्र होईल म्हणजे सोशल मीडिया वापरतो त्याप्रमाणे विद्यार्थी एकट्यानेच तंत्रज्ञान हाताळतील इतके सोयीस्कर शिक्षण उपलब्ध होणार आहे. भारतात आणखी एक मोठा बदल पाहायला मिळेल तो म्हणजे प्रादेशिक भाषेवर येत्या काळात जास्त भर दिला जाईल, तसेच डिजिटल खासगी शिक्षण आणखीन स्वस्त होणं अपेक्षित आहे’’, अशी माहिती ‘ब्रेनली’ या डिजिटल शिक्षण देणाऱ्या अॅपचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश ब्यासनी यांनी दिली.
‘‘ओपन एज्युकेशन रिसोर्सेस म्हणजे टेक्स्टबुक जाऊन विविध साहित्य जे इंटरनेटवरून विद्यार्थी शिकतात आणि व्हिडीओ लर्निंग हे काही ट्रेण्ड डिजिटल शिक्षणामध्ये सध्या आहेत. डिजिटल शिक्षण हेच यापुढे भविष्य राहणार आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून उपलब्ध असणारे मार्गदर्शन त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चरचा वापर जोरात वाढल्याने या शिक्षणावर बरेच विद्यार्थी आता अवलंबून आहेत. परीक्षा, अभ्यास आणि गुण आता पूर्णत: डिजिटल होणार आहेत. यामध्ये आता फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षक आणि प्रशिक्षकांसाठीही स्वॉट पध्दत अंगीकारली जाणार आहे. ज्यातून गुण, दोष, संधी आणि धोका याचा पुरेपूर अंदाज बांधता येईल. येत्या काळात विद्यार्थ्यांकरता छंद शिक्षणही मोठया प्रमाणावर डिजिटली उपलब्ध होईल. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम्सचा विकास होतो आहे, ज्यात पर्सनल लर्निंग, कोलॅब्रेटिव्ह लर्निंग म्हणजे सामूहिक शिक्षण, अॅडॉप्टिव्ह लर्निंग यांचा प्रसार वेगाने होतो आहे. लर्निंग म्हणजे फक्त अभ्यास नसून गेमिफिकेशनचीही यात भर पडली आहे. ई-टेक्स्टबुक्स, ई-चॅनेल्स, थ्रीडी, आभासी वास्तव असे आधुनिक तंत्रज्ञान येत्या काळात शिक्षण क्षेत्रात निश्चितच पाहायला मिळेल’’, असे ‘इंडियन स्कूल फायनान्स’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विर्खरे यांनी सांगितले.
तर एकीकडे हायब्रिड लर्निंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच रेकॉर्डेड लर्निंग ज्यात विद्यार्थी केव्हाही आणि कधीही आपापल्यापरीने शिकू शकतात, अशी माहिती ‘आकाश इन्स्टिट्यूट’चे अनुराग तिवारी यांनी दिली. रेकॉर्डेड लर्निंगप्रमाणेच डिजिटली शिक्षकाकडून शिकण्याची म्हणजेच लाइव्ह लर्निंगची प्रक्रियाही तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल शिक्षण पध्दतीला सामोरं जाऊनही ती अजून म्हणावी तशी सहज अंगवळणी पडलेली नाही. मात्र येत्या काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीप्रमाणेच डिजिटल शिक्षण पध्दतीतही शिस्त येईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करताना दिसतात.
पारंपरिक कार्यसंस्कृतीही कायम राहील…
करोनामुळे वर्क फ्रॉम होमची संस्कृती चांगली रुजली आहे. डिजिटल कार्यपध्दतीचा विस्तार होत असला तरी प्रत्यक्ष भेटून एकमेकांबरोबर सहकार्याने काम करण्याची पारंपरिक कार्यपध्दतीही कायम राहणार. करिअरचा विचार करता एकाच वेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन जगाशी जुळवून घ्यावे लागणार आहे, असे मत दिशा काउन्र्सिंलग सेंटरच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
करिअरसाठी आयटी, पेमेंट गेटवे, ई-कॉमर्स, क्लाऊड कॉम्प्र्युंटग या विषयातील ऑनलाइन सर्टिफिकेट्समधून नव्या वाटा शोधल्या जातील. क्लाऊड कॉम्प्र्युंटगचा वापर बऱ्याच ऑफिसमधून केला जातो. ऑनलाइन ब्र्रोंकग, हार्डवेअर सिस्टिम, सर्व्हर सिस्टिम, इन्फॉर्मेश सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी या सर्वच करिअरच्या संधींनी प्रचंड वाव असेल. डेटा सायन्सला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे त्याचबरोबर सोशल मीडिया मार्र्केंटग, डिजिटल मार्र्केंटग, कन्टेंट निर्मिती यामध्ये करिअरच्या संधी आहेत. युट्र्यूंबग, इफेक्टिव्ह रिल्स आणि ऑनलाइन फिल्मर्मेंकग, म्युझिक या क्षेत्रातही तरुणांना करिअरच्या संधी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
viva@expressindia.com