उंच, शिडशिडीत, सुडौल बांध्याच्याच मॉडेल्स नेहमी फॅशन शोच्या रॅम्पवर दिसतात. पण मॉस्कोमध्ये झालेल्या मर्सिडीझ बेंझ फॅशन वीकमध्ये यंदा प्रथमच अपंग, विकलांग मॉडेल्सनी ‘रॅम्प वॉक’ केला. खास विकलांगांसाठी असलेलं कलेक्शन सादर करण्यासाठी मॉडेल्स व्हीलचेअरवरून रँपवर अवतरल्या. या फॅशन शोमध्ये अंध, अपंग, गतिमंद, मतिमंद, उंचीनं न वाढलेल्या स्त्री- पुरुष मॉडेल्सनी भाग घेतला.