– रोशनी
प्रिय रोशनी,
तुमच्या वर्णनावरून तुम्ही मध्यम बांध्याच्या वाटता. पण एक गोष्ट सुरुवातीलाच सांगितली पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत नेहमी सलवार कमीझ किंवा चुणीदार घालत आला आहात. मी एकदम काही वेस्टर्न आऊटफिट्स सुचवले तर तुम्हाला त्यात कंफर्टेबल वाटेलच असं नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचं स्टाईल स्टेटमेंट बदलणं हे खूप धीराचं काम आहे. मनोमन त्यासाठी बरीच तयारी करावी लागते. कारण नेहमी लोकांना तुमच्याकडे एका ठरावीक पेहरावात बघण्याची सवय असते. एकदम त्यात बदल झाला तर तुमचे तुम्हाला व पाहणाऱ्या इतरांनाही कदाचित ते विचित्र वाटू शकते.
या परिस्थितीत बदल करायचे तर ते नेहमी सावकाश, लक्षात येतील न येतील असे करायला हवेत.
उदाहरणार्थ सुरुवातीला तुम्ही सलवारऐवजी धोती पँट्स किंवा चुणीदारऐवजी लेगिंग्ज अथवा जेगिंग्ज वापरून बघा. कुडत्याची लांबी, बाह्य़ांची स्टाइल बदलून बघा. थोडे दिवस हे छोटे बदल करत राहा आणि मग नेक पॅटर्न बदला. तुम्हाला आवडत असतील तर खोल गळ्याचे ड्रेस घाला आणि इन-कट ड्रेसही वापरून पाहा. आता ही स्टाइल काही दिवस करत राहा. त्याची डोळ्यांना सवय झाली की मग जीन्स आणि कुडता
अशा प्रकारे तुमची स्टाइल पायऱ्या पायऱ्यांनी बदला. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि स्टाइलची फजिती होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – तुम्ही स्टाइल बदलत असाल तेव्हा सध्या कुठली फॅशन चलतीत आहे, कसला ट्रेंड आहे, याचा विचार करा, शोध घ्या आणि त्याप्रमाणे बदल करा. उदाहरणार्थ सध्या लेसचं कापड प्रचलित आहे. तुमच्या कुर्त्यांसाठी लेसचं कापड वापरायला हरकत नाही. आणि या सगळ्या स्टाइल चेंजमध्ये तुमचे नेहमीचे सलवार- कुडता- चुणीदार वापरणं अगदी बंद करू नका. ते कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाही.
तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील.
सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com