ब्रश वापरण्यासंबंधी टिप्स :
१. ब्रश स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात ब्रशची ब्रिसल्स बुडवा. हँडल बांबूचे असेल तर ते ओले होऊ देऊ नका.
२. बेबी श्ॉम्पूचे २-३ थेंब ब्रिसल्सवर टाका. ब्रशच्या साइज प्रमाणे शॅम्पूचे प्रमाण वाढवा. फाउंडेशन किंवा ब्लशरच्या ब्रशेससाठी थोडे जास्त ४-५ थेंब टाका, लहान साइज असलेल्या ब्रशसाठी २-३ थेंब पुरेसे होतात.
३. फेस येईपर्यंत ब्रिसल्स श्ॉम्पूमधे हलक्या दाबाने चोळा. खात्री करा की प्रत्येक ब्रिसल व्यवस्थित साफ झाला आहे. चोळताना काळजी घ्या की, ब्रशचा मूळचा आकार बिघडणार नाही व शॅम्पू/फेस ब्रशच्या मागील भागावर म्हणजेच हँडलवर (मेटल/ बांबूचा भाग) येणार नाही.
४. नंतर पाण्याने धुवा. जोपर्यंत फेस दिसत नाही तोपर्यंत पाण्याने धुवत राहा. ब्रिसल्सच्या आतील भागातीलसुद्धा फेस जायला हवा. ब्रश नळाखाली धुतले तरी चालेल पण नळाची धार जास्त नको.
५. कॉटनच्या मऊ कपडय़ावर ब्रशमधील पाणी टिपून घ्या. ब्रिसल्सचा मूळचा आकार बदलायला नको व ब्रिसल्स तुटायलाही नकोत.
६. आठ ते चौदा तास ब्रश मऊ कपडय़ावर कोरडे होण्याकरिता ठेवा व थोडय़ा थोडय़ा वेळाने गोलाकार पद्धतीने फिरवत राहा जेणेकरून ब्रिसल्सच्या सर्व बाजू कोरडय़ा होतील.
७. ब्रश वापरण्याआधी पूर्णपणे कोरडे झाले आहेत याची खात्री करून घ्यावी.
८. बेबी शॅम्पू ऐवजी सौम्य हँड वॉश किंवा िक्लजिंग मिल्कचा वापर करू शकता. हँड वॉश सौम्य असेल तरच वापरा नाही तर चेहऱ्याला अॅलर्जी येण्याची शक्यता असते.
९. ब्रिसल्सची प्रत उत्तम राखण्याकरिता कंडिशनरचाही वापर करतात.
१०. आठवडय़ातून एकदा किंवा दोन आठवडय़ांतून एकदा ब्रश साफ करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे नुसतेच ब्रश चांगले राहत नाहीत तर बॅक्टेरियांपासूनही संरक्षण होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2014 रोजी प्रकाशित
मेक-अप टिप्स : मेक-अप ब्रशचे प्रकार
मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
First published on: 18-04-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makeup brush types