मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, कशाचा ट्रेंड आहे अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
मेकअपमध्ये डोळे किंवा ओठ यांना जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व भुवयांनासुद्धा आहे. कारण ठळक भुवयांमुळेच चेहरा रेखीव आणि उठावदार दिसतो. खूप कमी जणींच्या नसíगक भुवयांची ठेवण ही  अनुरूप असते. पण ज्यांच्या भुवया विरळ किंवा दाट आहेत, त्यासुद्धा मेक अपद्वारे सुबक बनवू शकतात. मेक-अप करण्याआधीचे सर्वात पहिले महत्त्वाचे काम म्हणजे भुवईला योग्य आकार देणे. तुमच्या नसíगक भुवईचा आकार आणि चेहऱ्याची ठेवण याचा विचार करूनच थ्रेडिंग करावे आणि सुबक आकार द्यावा. आयब्रो एनहान्स करायला वापरले जाणारे प्रॉडक्टस आधी पाहू या.
क्लीअर जेल : क्लीअर जेलचा वापर भुवईचे केस एका जागी स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. (हेअर स्प्रेप्रमाणेच याचा उपयोग आहे) ज्यांच्या भुवया दाट आहेत व केसही लांब आहेत त्यांनी क्लीअर जेल अप्लाय करावे.
टिन्टेड जेल : क्लीअर जेलप्रमाणेच टिन्टेड जेलचा उपयोग आहे पण टिन्टेड जेल हे सौम्य असून पातळ, विरळ भुवयांना उपयुक्त आहे. पावडर स्वरूपातील प्रॉडक्ट्स लावले तर ते एका जागी टिकून राहण्याकरिता टिन्टेड जेल लावावे.
पेन्सिल : सर्वात प्रचलित असलेले व लावण्यासही अत्यंत सोपे असे भुवयांचे मेक-अप प्रॉडक्ट म्हणजे आयब्रो पेन्सिल. तिरका कट असलेली पेन्सिल भुवया दाट दिसाव्यात म्हणून वापरतात. पेन्सिलचा रंग निवडताना भुवयांना मॅच होईल तोच रंग निवडा नाही तर त्या नसíगक वाटणार नाहीत. पेन्सिल हलक्या हाताने फिरवल्यानंतर ब्रो ब्रशने भुवयांमध्ये रंग ब्लेंड करावा.
पावडर : प्रेस्ड पावडर आय श्ॉडो किंवा आयब्रो पावडर भुवयांच्या डिटेल्ड मेक-अपसाठी वापरतात. पेन्सिलप्रमाणेच पावडरच्याही शेड बाजारात उपलब्ध आहेत.
वॅक्स : जेलप्रमाणेच याचाही उपयोग भुवईचे केस एका जागी स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. वॅक्स हे लाँग लास्टिंग इफेक्ट देते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* जाडसर भुवया हे वय कमी दर्शवतात. जर यंगर लूक हवा असेल तर भुवईची जाडी जास्त ठेवावी.
* भुवईचा सुरुवातीचा भाग जाडसर ठेवून कमान करावी. नंतर निमुळता आकार द्यावा. नाकपुडीच्या बाहेरील भागावर ब्रशचे एक टोक ठेवून साधारणत: ४५ अंशचा कोन येईल तिथून भुवई निमुळती करावी.
* ज्यांच्या भुवईचे केस लांब आणि जाड आहेत त्यांनी क्लीअर जेलचा लावावे. दैनंदिन मेक-अपसाठी फक्त क्लीअर जेल लावले तरी चालेल, पेन्सिल किंवा पावडर लावण्याची गरज नाही.
* पातळ भुवयांसाठी ब्लॅक पेन्सिल चुकूनही वापरू नये. खाकी किंवा ब्राऊन रंगाची पेन्सिल किंवा पावडरचा वापर करावा. रोजच्या मेकअपसाठी वॅक्स पेन्सिल योग्य राहील, लावायलाही सोपी आणि वेळही कमी लागतो.
* लग्न-समारंभ किंवा पार्टीसाठी मेक-अप करताना मॅट फिनिश्ड टॅन किंवा ब्राऊन आय शॅडो ‘अँगल्ड ब्रो ब्रश’ने विरळ भागावर लावावा. संपूर्ण भुवयांचा रंग एकसारखा न ठेवता कमान असलेला भाग ते शेवटचे टोक थोडेसे गडद असू द्यावे आणि आतील भाग फिकट राहू द्यावा.
* शेवटचे टोक गडद करण्याकरिता त्याच रंगाच्या पेन्सिलचा वापर केला तरी चालेल.
* फिनिश्ड लुक देण्यासाठी भुवयांच्या भोवतालच्या भागावर हाइलायटर लावावे. नंतर भुवयांच्या प्रकारानुरूप क्लीअर / टिन्टेड जेल लावून सेट होऊ द्यावे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makeup easy tips for getting perfect eyebrows