ही फॅशन अधोरेखित करताना आपला एथनिक इंडियन लूक जपण्यासाठी गेल्या वर्षी अभिनेत्री विद्या बालननं फ्रान्समधल्या कान महोत्सवात जाताना नथनी घातली होती. भारतामधल्या एका फॅशन शोमध्ये सोनम कपूरनंही मोठय़ा खडय़ांची नथनी घालून स्टाइल स्टेटमेंट केलं होतं. जुही चावलादेखील एका फॅशन शोदरम्यान रॅम्पवर मराठमोळी नथ घालून अवतरली.
हल्ली रॅम्पवरची स्टाइल बाजारात यायला वेळ लागत नाही. त्या न्यायानं बाजारपेठेनंदेखील या स्टाइलची दखल घेतली. आता पुन्हा एकदा आपल्याकडच्या बाजारात म्हणूनच नथ आणि नथनीला
तीच कथा कपाळावरच्या टिकलीची. कुंकू किंवा टिकली ही मधल्या काळात भारतीय फॅशनच्या पटावरून पार फेकली गेली होती. विशेषत: आपल्याकडे वेस्टर्न वेअरचं प्रमाण वाढलं आणि टिकली हद्दपार झाली. वेस्टर्न वेअरवर कुंकू किंवा टिकली सूट होत नाही. त्यामुळे हे सौंदर्य आभूषण थेट हद्दपार झालं होतं. आता पुन्हा एकदा टिकलीला फॅशनेबल करण्याची जबाबदारी रॅम्पवरच्या मॉडेल्सनी घेतली आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमधल्या अनेक शोमध्ये मॉडेल्स कपाळावर टिकली लावून अवतरल्या. साधीच गोल टिकली त्यांनी फॅशनेबल करून टाकली. फॅशन फिरून परत येते, असं म्हणतात. सध्याच्या पारंपरिक बाजाची फॅशन बघता हेच पुन्हा जाणवतेय.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2014 रोजी प्रकाशित
फॅशनच्या रॅम्पवर नथ आणि टिकली
फॅशन कॉन्शस आधुनिक तरुणी आणि पारंपरिक दागिने यांचा मेळ बसणं कठीण, असं आपल्याला इतके दिवस वाटत होतं. नथ, बिंदी आणि वर टिकली हा लूक फॅशनेबल कधीच वाटत नव्हता.

First published on: 03-10-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nath and spangle on fashion ramp