झ्यँग चिली चिकन
साहित्य : बोनलेस चिकन – ८ ते ९ पिस, सिमला मिरची लांबट कापून चिरलेली, लांबट चिरलेला कांदा, चिरलेले आलं, चिरलेले लसूण – १ चमचा, चिरलेली हिरवी मिरची, व्हाइट पेपर पावडर – चिमूटभर, ऑरेंज ज्यूस कॉन्संट्रेट – २ चमचे, तळण्यासाठी – तेल, सिझनिंग क्युब्स, मीठ – चवीनुसार, टोमॅटो केचप – २ चमचे, आवश्यकतेनुसार पाणी, सोया सॉस – १ चमचा, कोथिंबीर – ३ चमचे.
कोटिंगसाठी साहित्य : मदा, कॉर्नफ्लॉवर, पाणी, मीठ – चवीनुसार, व्हाइट पेपर – चिमूटभर
कृती :  कोटिंगसाठी दिलेले साहित्य एकत्र करून त्यात चिकनचे तुकडे घालून ते डीप फ्राय करून घ्यावे. एका कढईमध्ये २ चमचे तेल टाकून गरम करून त्यात आले, लसूण, हिरवी मिरची, सोयासॉस, ऑरेंज ज्यूस कॉन्संट्रेट, सिझनिंग क्युब्स, मीठ टाकून परतवून घ्यावे. त्यामध्ये थोडे पाणी टाका.  नंतर तयार मिश्रणात फ्राय चिकन टाका. थोडय़ा पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ते तयार मिश्रणात घालून त्याला टॉस करून वरून कोथिंबीरने गाíनश करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गार्लिक रोझ मेरी चिकन
साहित्य : चिकन – ६ ते ७ पिसेस
मॅरिनेशनसाठी साहित्य : मस्टर्ड पेस्ट – १ चमचा, चिरलेले लसूण – १ चमचा, रोझ मेरी हर्बस् – १ चमचा (नसेल तर मिक्स हर्बस् वापरा), तेल – ४ चमचे, मीठ – चवीनुसार, काळीमिरी पूड – चिमूटभर, बाब्रेक्यू सॉस – २ चमचे (असल्यास, नसल्यास टोमॅटो केचप -२ चमचे)
कृती : वर दिलेले साहित्य व्यवस्थित चिकनला लावून दोन तास चिकन मॅरिनेट करा. चिकनला २० ते २५ मिनिटे ओव्हनमध्ये बेक करून घ्या. गरमागरम सव्‍‌र्ह करा.
टीप : जसे भारतीय जेवणामध्ये कोथिंबीरचा सढळ हाताने आपण वापर करतो व त्यामुळे जेवणाला विशिष्ट स्वाद येतो त्याचप्रमाणे रोझ मेरी, पासले, बेसील या प्रकारचे हर्बस् काँटिनेंटल डिशेस बनवताना वापरले जातात आणि प्रत्येक हर्बस्चा एक विशिष्ट स्वाद असतो. सहज उपलब्ध होत असतील तर थोडा चेंज म्हणून आपण ट्राय करायला हरकत नाही.

कॉटेज चीज स्क्वेअर्स
साहित्य : पनीरचे चौकोनी कापलेले तुकडे – ६ ते ७, रंगीत सिमला मिरची चौकोनी कापलेले – ५ ते ६, झुकनी – चौकोनी कापलेले – ५ ते ६,  बांबू स्टिक्स – ५ ते ६.
मॅरिनेशनसाठी साहित्य : तेल – ४ ते ५ चमचे, मीठ चवीनुसार, ब्लॅक पेपर पावडर – चिमूटभर, फ्रेश थाइम्स – चिमूटभर, लेमन ज्यूस – १ चमचा. सर्व साहित्य एकत्र मिक्स करून मॅरिनेशन तयार करून घ्या.
कृती : पनीरचे तुकडे, सिमला मिरची झुकनी मॅरिनेशनमध्ये मिक्स करून बांबू स्टिक्सला लावून घ्या. नंतर तव्यावर श्ॉलो फ्राय करून घ्या.  चिली गार्लिक योगर्ट सॉससोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.
टीप :- ठेचून घेतलेले लसूण – ३ ते ४ पाकळ्या,  बारीक चिरलेली हिरवी मिरची -२,  बांधलेले घट्ट दही – १ वाटी, मीठ एकत्र करून चिली गार्लिक योगर्ट सॉस तयार करा.

व्हर्मिसिली व्हेजी लॉलीपॉप्स
साहित्य : उकडलेले बटाटे – ३ नग, चाट मसाला – चिमूटभर, हिरवी मिरची – १ चमचा, पुदिना चटणी – २ चमचे, कॉर्नफ्लॉवर, मदा – १ चमचा, मीठ – चवीनुसार, तळण्यासाठी तेल. शेवया.
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, मदा, कॉर्नफ्लॉवर, पुदिना चटणी एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून सिलेंड्रिकल शेपमध्ये वळा. शेवयामध्ये घोळवून प्रत्येक लॉलीपॉपला टुथपिक लावा व डिप फ्राय करा. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only starter