कुठल्याही हॉटेलात जा..
मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोफू नुडल्स सूप
साहित्य : टोफू तुकडे- ५० ग्रॅम,  उकडलेले नुडल्स, लांबट कापलेला पातीचा कांदा, गाजरचे पातळ स्लाइस, गाजर पाकचॉय (चायनीज डिशमध्ये वापरली जाणारी भाजी आहे. असल्यास वापरा नाहीतर पत्ताकोबी वापरली तरी चालेल.) मशरूम स्लायसेस- २ ते ३, व्हेजिटेबल स्टॉक, तिळाचे तेल, सिझनिंगक्युबस्, किसलेले आलं, व्हाइट पेपर पावडर- १ चिमूट, (व्हाइट पेपर नसल्यास लांबट कापलेली हिरवी मिरची -१), मीठ- चवीनुसार.
कृती : १) स्टॉक उकळायला ठेवा. त्यामध्ये भाज्या घाला. दोन मिनिटांनतर नुडल्स, टोफू आणि मशरुम व इतर साहित्य सूपमध्ये घाला. गरमागरम सव्‍‌र्ह करा.
टीप  : पावसाच्या दिवसांमध्ये असं गरमागरम सूप करून प्यायला खूप मजा येते. हे हेल्दी आणि पोटभरीचे सूप आहे.

रोमँटिक चहा
साहित्य : पाणी- ४ कप, पुदीना (चिरलेली)- १० ते १२ पाने,  दालचिनी- १ स्टीक,  लवंग- ४ ते ५, अख्खी काळीमिरी, मध- २ चमचे, साखर- १ चमचा, टी बॅग्ज- २ (नसेल तर साधा चहा- १ चमचा), लिंबू.
कृती : पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मध, लिंबू आणि टी बॅग्ज सोडून इतर सर्व साहित्य टाका. साधारण ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. आता टी बॅग्ज या पाण्यामध्ये टाका आणि २ ते ३ मिनिटे चहा उकळू द्या. आता लिंबू आणि मध टाका व चहा एका ग्लासमध्ये गाळून घ्या. िलबाच्या स्लाइसने गाíनश करून गरमागरम सव्‍‌र्ह करा.
टीप : सध्या मस्त पावसाळी वातावरण आहे. बाल्कनीमध्ये बसून गरमागरम हा चहा प्यायला मजा येते. ट्राय करा.

मेथी मूग पकोडी
पकोडीसाठी साहित्य : मुगाची डाळ- १ वाटी, आलं बारीक चिरलेलं- २ चमचे, हिरवी मिरची बारीक चिरलेली- २ चमचे, कोथिंबिर- ३ चमचे, मीठ- चवीनुसार, तेल, ओवा- अर्धा चमचा, चिरलेला कांदा- मध्यम आकाराचा, धनेपूड- अर्धा चमचा, हळद- पाव टी स्पून, हिंग, मेथी- १ जुडी
कृती : मुगाची डाळ भिजवावी ३ तासांनंतर ती मिक्सरमधून वाटून घ्यावी. आता वाटलेल्या मुगाच्या डाळीत बारीक चिरलेल आलं, बारीक चिरलेली मिरची, चिरलेली मेथी, कोथिंबिर, मीठ, तेल, ओवा, चिरलेला कांदा, धनेपूड, हळद व हिंग व्यवस्थित मिक्स करा व पकोडी बनवून तेलात तळून घ्या.

चीझी मसाला पॅटी
साहित्य : उकडून घेऊन कुस्करून घेतलेले रताळे- १ (रताळे नसेल तर बटाटा वापरला तरी चालेल), बारीक चिरलेली हिरवी मिरची, प्रोसेज्ड चिज, बारीक चिरलेली सिमला मिरची- १,  बारीक चिरलेली कोथिंबिर, धणे पावडर, कॉर्नफ्लॉवर, मदा, तीळ- १ चमचा, चाट मसाला, मीठ- चवीनुसार,  किसून घेतलेले गाजर, कसूरी मेथी.
कृती : वर दिलेले साहित्य व्यवस्थित एकत्र करा. त्याचे थोडे गोळे तयार करून हातावर दाबून त्याचे पॅटी तयार करून घ्या. मध्यम आचेवर तळून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only starter tofu noodles soup cheese masala patty romantic tea methi mug pakodi