नेहमी सोनेरी आणि चंदेरी चप्पल घालून पार्टीला जायचा कंटाळा आला असेल तर या चप्पल त्याला मस्त पर्याय ठरतील. यांचा बेस जरी मरून असला तरी तो पायाखाली लपला जातो आणि पिवळ्या, लाल, निळ्या रंगांच्या तीन मोठय़ा खडय़ांनी या मल्टीयुज ठरतात आणि लूक पूर्ण करायला सोबत खडे आहेतच.
यूएसपी : नेहमीच्या सोनेरी चप्पलांना ऑप्शन
ठिकाण : बांद्रा ल्ल किं. : २०० रु.
िवटर सिझन इज ऑन. तेव्हा तुमचा संपूर्ण वॉडरोब डार्क शेड्सनी भरून जायला हवा. पण तरीही आपण मागच्या सिझनमधील काही गोष्टी या सिझनमध्येसुद्धा वापरतो. ही ऑरेंज बॅग त्यातलीच एक आहे. छोटी आणि सुटसुटीत असल्यामुळे सिनेमाला जाताना किंवा सहज एक फेरफटका मारताना तुमच्या सिंपल लूकला एक हटके अंदाज देते.
यूएसपी : कूल कलर कूल लूक
ठिकाण : शिवाजी पार्कजवळील एक दुकान
किंमत : १५० रुपये
फॅशन म्हटलं तर नेहमीच मुलींचा विषय का काढायचा. म्हणूनच आम्ही या वेळच्या ‘पीक’मध्ये मुलांसाठी हे एक खास ब्रेसलेट उचललं. ब्राऊन कलर आणि बेल्टचा लुक यातून या ब्रेसलेटचा फंकीनेस मस्त उठून येतो. रोज कॉलेजला जाताना टी शर्ट आणि जीन्सबरोबर हे ब्रेसलेट नक्कीच भाव खाऊन जाईल.
यूएसपी : बेल्टचा फंकीलूक
ठिकाण : स्टेशनजवळील ठेलेवाला ल्ल किंमत : ५० रु.