सुंदर, मुलायम, नितळ त्वचा आणि रेशमी केस ही सौंदर्याची आद्य लक्षण समजलं जातं. पण अशी त्वचा कायम राखायची असेल तर त्याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. पावसाळी, दमट हवेतही मुलायम, सुंदर त्वचा कशी राखाययी ? कॉस्मॅटॉलॉजिस्ट डॉ. अमीत कारखानीस यांच्या स्किन अँड हेअर केअरविषयीच्या खास टिप्स..

आभाळात ढगांची गर्दी होऊन हवेची आद्र्रता वाढली. सरीवर सरी कोसळताना अंर्तमन सुखावून गेलं खरं. पण त्वचा मात्र अशी उत्साहित दिसत नाही; किंबहुना पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि निर्जीव होते. पावसाळ्यात हवेतील, बाष्पांचे प्रमाम वाढल्यामुळे त्वचेतील छिद्रे बुजून त्यामुळे त्वचेचे स्वाभाविक गुणधर्म बदलतात. त्यामुळे आता त्वचेची काळजी विशिष्ट प्रकारे घ्यावी लागणार.
तुमच्या त्वचेची खास काळजी घेण्यासाठी खालील सूचना पाळाव्यात-
– त्वचा योग्य प्रकारच्या साबणविरहित फेस वॉशने तीन ते चारवेळा व्यवस्थित स्वच्छ करावी, त्यामुळे त्वचेमधील धूळ निघून त्वचेची रंध्रे मोकळ होतात व त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
– त्वचेचा लवचिकपणा व तारुण्य परत आणण्यासाठी दिवसातून दोनवेळा अल्कोहोल विरहित स्कीन टोनर्स वापरावेत. त्यामुळे त्वचेतील नवीन पेशी उद्यपीत होतात व जुन्या पेशीची जागा घेऊन त्वचेला तारुण्यातील झळाळी प्राप्त होते.
– त्वचा कोरडी व रूक्ष असल्यास चांगल्या मॉइश्चरायजरचा वापर करावा व रात्री झोपण्याआधी गुलाबाणी व ग्लिसरीन किंवा बदाम तेलाचा वापर केल्यास त्वचा लवचिक व निरोगी होईल.
– त्वचेवर काळे डाग किंवा मुरूम व्रण असल्यास तेलकटपणा कमी करावा. त्यासाठी वॉटरबेस मॉइश्चरायजर, क्लिजर आणि सायट्रस फेसपॅक वापरावेत.
– भरपूर पाणी पिण्यानेही त्वचेतील तेलग्रंथीतून सीबम स्रवण्याचे प्रमाम संतुलीत होते.
– सूर्याचे अतीनील किरण हे ढगाळ वातावरणातूनही त्वचेवर आघात करत असता. त्यासाठी कमीतकमी २५ किंवा त्यापेक्षा जास्त एसपीएफ असणाऱ्या सन स्क्रीनचा नियमित वापर करावा.
– त्वचेतील निर्जीव पेशी नित्यनियमाने निर्माण होत असतात. त्या त्वचेला कोणतीही इजा न पोहोचवता निपटून टाकण्यासाठी योग्य त्या स्कीन स्क्रबचा वापर करावा.
– कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी दिवसातून नियमितपणे प्राशन केल्यास त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत होते…
– केसांची निगा राखण्यासाठी दिवसातून किमान दोनवेळा तरी कोमट पाण्याने व सौम्य श्ॉम्पू वापरून केस धुतल्यास घामटपणा व तेलकटपणा कमी होऊन डोक्यावरील केसातील कोंडय़ाचे प्रमाणही कमी होते व केस वाढम्यास मदत होते.
– पावसाळ्यात नकली दागिने किंवा जड दागिने गळा व मनगटावर घालून जास्त वेळ राहिल्यास त्याखाली घाम व तेलकटपणामुळे पावसाळ्यातील त्वचारोग होऊन त्वचा विद्रूप होऊ शकते. म्हणून वरील दाग-दागिने घालण्याचे टाळावे.
– वर्षांऋतूत फंगल इन्फेक्शननं होणऱ्या त्वचा रोगाचे प्रमाण निश्चितच वाढते. म्हणून ओले कपडे, मोजे वा पायामुळे पावलातील भेगांचे प्रमाण वाढते व खरूज, नायटा व रिंगवर्म इंफेक्शन झाल्यास त्यावर स्कीन स्पेशालिस्टकडे जाऊन योग्य ते उपचार करावेत.