अकरावीत प्रवेश घेतल्यावर कॉलेजमधलं पहिलं पाऊल ही एक वेगळीच अवस्था असते. त्यात उत्साह असतो, उत्सुकता असते, थोडंसं बावरलेपण असतं, धाकधूक असते, आनंद असतो आणि प्रचंड एक्साइटमेंट असते कारण.. एका नव्या आयुष्याला सुरुवात होणार असते.
‘अगं त्याच त्या टाइपचे कपडे नको गं आई. मला आता जरा ट्रेण्डी घ्यायचंय काहीतरी.’
‘बरं बाई! तुला हवं ते घे.. आता तुला कोण बोलणार!’
असे काहीसे संवाद कानावर पडले म्हणजे घरातली मुलगी कॉलेजला जायला लागली असणार हे निश्चित समजावं. अकरावीत प्रवेश घेतल्यावर कॉलेजमधलं पहिलं पाऊल ही एक वेगळीच अवस्था असते. त्यात उत्साह असतो, उत्सुकता असते, थोडंसं बावरलेपण असतं, धाकधूक असते, आनंद असतो आणि प्रचंड एक्साइटमेंट असते. कॉलेज जायची तयारी हा मोठा विषय आहे. कॉलेजची तयारी, त्यातूनही मुलींची म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. लेटेस्ट फॅशनचे कपडे, त्यावर मॅचिंग अॅक्सेसरीज, मॅचिंग चपला, मॅचिंग हेयर बॅन्ड्स, क्लिप्सपासून, ट्रेण्डी कॉलेज बॅग, हटके वॉलेट, स्टाइलिश घडय़ाळ ही सगळी खरेदी करणं ओघानं आलंच. आता शाळेतून कॉलेजला जायचं म्हणजे लुक चेंज तर हवाच. सो, त्यासाठी वेगळा हेअरकटसुद्धा मस्ट आहे. गंमत म्हणजे शाळेत असताना नवीन वर्षांची वह्य़ा-पुस्तकं आणि युनिफॉर्म घेतला की झाली तयारी. पण याच्या अगदी विरुद्ध सिच्युएशन कॉलेजला जाताना असते. ‘कॉलेजची तयारी इज इक्वल टू प्रचंड शॉिपग’ हे समीकरण आता रूढ झालंय. त्यामुळे नुकत्याच दहावी झालेल्या स्पेशली मुलींना या सगळ्याची क्रेझ तर असणारच. ‘कोलेज लाइफची सर्वात आवडणारी गोष्ट कोणती?’असं विचारलं तर मोस्टली सगळ्या मुली ‘फेवरेट आउट-फिट्स घालता येतात’ असंच म्हणतील.
पण गाइज.. ही कॉलेज शॉपिंग फक्त मुलींना लागू नाही बरं का! मुलंदेखील याबाबतीत मागे नाहीत. एकीकडे कॉलेजची तयारी करता करता दुसरीकडे तिथल्या मुलींना इम्प्रेस करायची तयारीसुद्धा सुरू आहे. बरोबर ना? कॉलेजकुमार होण्यासाठी उत्सुक असलेला यश घैसास सांगतो, ‘अजूनपर्यंत मी कॉलेजसाठी स्पेशल शॉिपग नाही केलंय. पण लवकरच करणारे. मला कॉलेजमधे खूप सारे नवीन फ्रेंड्स बनवायचेत. जाम फिरायचंय. अभ्यासपण करायचाय, पण लेक्चर बंक करून मित्र-मत्रिणींबरोबर फिरायचंय. खूप कल्ला करायचं ठरवलंय. हां.. आता सायन्सला जाणारे, तर करीन थोडाफार अभ्यास.’
पण खरंच, कॉलेजच्या पहिल्या दिवशी भल्या मोठय़ा आवारात एखादं लेक्चर बंक करून कॅन्टीनचा चहा मित्र-मत्रिणींसोबत पिण्यासारखा आनंद नाही. आहाहा ऑसम! आणि शाळेत जवळजवळ दहा र्वष सगळे तास अटेंड केल्यानंतर ‘कॉलेजका एक लेक्चर बंक करना तो बनता है’ मग, एखाद्या लेक्चरला टांग देऊन एकतर मस्तपकी कट्टय़ावर बसायचं किंवा कॉलेजच्या आजूबाजूला भटकंती करायची, असे सगळे प्लॅन्स कॉलेजोत्सुक मंडळींच्या मनात सुरू असतील याबद्दल शंका नाही.
अर्थातच कॉलेज लाइफच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपल्याला चांगले फ्रेंड्स मिळतील का, नवीन वातावरणाशी जुळवून घेता येईल का, असे प्रश्न पडून थोडी भीती वाटते. पण दुसरीकडे एक नवीन रंगीबेरंगी कॉलेजचं जगही खुणावत असतं. जीवनातल्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात करताना ही तळ्यात-मळ्यात अशी संमिश्र भावनासुद्धा खूप गोड आणि गमतीदार असते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
कॉलेजच्या वाटेवर..
अकरावीत प्रवेश घेतल्यावर कॉलेजमधलं पहिलं पाऊल ही एक वेगळीच अवस्था असते. त्यात उत्साह असतो, उत्सुकता असते, थोडंसं बावरलेपण असतं, धाकधूक असते, आनंद असतो आणि प्रचंड एक्साइटमेंट असते कारण.. एका नव्या आयुष्याला सुरुवात होणार असते.

First published on: 11-07-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first step in the college