हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
महिला दिनाच्या आठवडय़ात आम्ही माध्यमातली ‘ती’ या नावाने मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमधल्या स्त्रियांच्या प्रतिमांविषयी लिहिलं होतं. या स्त्री प्रतिमा कालानुरूप बदलल्या खऱ्या पण त्या खरंच कालसुसंगत वाटताहेत का? या मालिका आणि जाहिरातीमधल्या तरुण मुलींशी तुम्ही रिलेट करू शकता का, हा खरा प्रश्न आहे. काही जाहिरातींमधून नव्या युगातल्या स्त्रीची बदलती मानसिकता छान टिपली जाते, तर काही जाहिरातींमधून मात्र तिच्यातल्या सुपर वुमनलाच पुन:पुन्हा साद घातली जाते. काही मालिकांमधल्या तरुण स्त्री व्यक्तिरेखा आपल्यातल्याच वाटतात. तर काही मालिकांमध्ये मात्र मेक-अप आणि दागिन्यांनी लगडलेली तद्दन दिखाऊ पात्र दिसतात. मालिकांमधले स्त्रियांचे घरगुती संघर्ष कुरापती किंवा कट-कारस्थान स्तरात मोडणारं असतं. तरीही याला छेद देत काही मालिका मात्र वेगळेपणामुळे लक्षात राहतात. माध्यमातील ‘ती’ या विषयावर अनेकींनी आपली मतं पोस्ट केली. मालिका आणि जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणाऱ्या स्त्रीप्रतिमा, त्यांचा खरे-खोटेपणा नि त्यांची कालसुसंगती आदी मुद्दे यात मांडण्यात आले.
काहींनी मालिका पाहत असलो तरी त्या सीरियसली घेत नाही, टाइमपास म्हणून बघतो, असं लिहिलंय तर काहींनी मालिका अजूनही जुन्या काळातच वावरत असल्याचं म्हटलंय. २१ व्या शतकात जग एकीकडे चाललंय आणि आपल्या मालिका आणि त्यातल्या स्त्रिया विरुद्ध दिशेला, असंही काहींना वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया इथं प्रसिद्ध करत आहोत.
मंजिरी सराफ
श्रेया ओवळेकर
प्रियदर्शनी दीक्षित
केतकी जोशी
प्रीती दुबे
मनीषा टोपले
तुम्ही लेखात उल्लेख केलेली ‘तनिष्क’ची जाहिरात मलाही आवडली. त्यासंबंधी माझं एक निरीक्षण म्हणजे ती वधू गोरीपान नव्हती. कारण एरवीच्या जाहिरातींमध्ये बऱ्याचदा गोऱ्या-सुंदर मुलीच दाखवल्या जातात. कुणाचा रंग त्याच्या-तिच्या ध्येयप्राप्तीत कशी काय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो? पण हे मुद्दे मनोरंजन क्षेत्रानं विचारात घेईपर्यंत आपल्या हाती फक्त ‘वेट अॅण्ड वॉच’ एवढंच उरतं.