‘हाय, फेण्डस्, व्हॉटस् अप..’ अशी दिवसाची सुरुवात होणं नि गुडनाइटच्या मेसेजेसनी रात्र होणं किंवा काही वेळा रात्रीही सतत ऑनलाइन राहाणं आदी गोष्टी कॉमन झाल्यात. यंगस्टर्सनी जणू सोशल साइटस् नि काही अॅप्सवर अॅक्टिव्ह असणं मस्ट आहे. तसं केलं नाहीत, तर एक भुवया उंचावलेला आश्चर्यचकित स्माइली तुमच्या पुढय़ात असतोच. चॅटिंग, स्माइलीज, इमोटिकॉन्स, सिम्बॉल्स नि ढेर सारं शेअरिंग हा टेक्नोसॅव्ही पिढीचा फंडा आहे. मात्र परीक्षेच्या काळात किंवा आपण अॅडिक्ट झाल्याचं भान वेळीच आल्यानं काही जण चक्क गायबव्रत किंवा मौनव्रताचा अंगीकार करतात. अशा अॅडिक्शनपासून सुटका होण्यासाठीही पुन्हा काही साइट्स-पेजेस डेव्हलप झाली आहेत. तरुणाईला कोणत्या साइट्स नि अॅप्स आवडताहेत, त्याविषयी त्यांना काय वाटतंय, त्याचा हा कानोसा.
श्रद्धा करंडे
कृतिका नातू
प्रथमेश खानोलकर
ईशान रेगे
अद्वेत आगाशे
हेमांगी मातोंडकर
हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.