हॅलो फ्रेंडस्! क्या है फिलहाल आपका रिलेशनशिप स्टेटस? कब हुवा है लास्ट अपडेट? बोले तो.. रिलेशनशिप ये कन्सेप्ट इतनी लंबीचौडी है, के क्या बताए.. ही कन्सेप्ट पुन्हा एकदा चच्रेत यायचं कारण म्हणजे चेतन भगतची ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणारी ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कादंबरी. चेतन भगतच्या कल्पक डोक्यातला विचार आपण प्रेडिक्ट करू शकणार नाही. चेतन तो है एक बेस्टसेलर रायटर. पण, आपून तो अपने हिसाब से भेजा लडा के देख सकता है. है के नही?
‘हाफ गर्लफ्रेंड’ ही काय भानगड आहे? ही काही नवी कन्सेप्ट आहे की काय? हाफ गर्लफ्रेंड म्हणजे नेमकं कोणतं नातं? यावर सोशल नेटवर्किंग साइटवर ऑलरेडी चर्चा सुरू आहे. कोणी म्हणतं ही रिलेशनशिप म्हणजे कन्फ्युजन, कोणी म्हणतं कॉम्प्रमाईज, कोणी म्हणतं त्यात कमिटमेंट नाहीये. अनेकांना ही एक ‘रिलेशनशिप अॅडजेस्टमेंट’ आहे, असं वाटतंय. फ्रेंडशिपपेक्षा काही तरी जास्त आहे, पण नक्की फिगरआऊट न करता येणारं हे नातं आहे, असं काही म्हणतात. कुणाला ही कथा हॉलीवूडपटावरून बेतलेल्या गोष्टीची गोष्ट वाटतेय, तर कुणी ही कन्सेप्टदेखील फॉरेनवरून आयात केल्याचं सांगतंय. या कन्सेप्टमध्ये मुलगा-मुलगी असा भेद नाहीये, म्हणजे हाफ गर्लफ्रेंड तसा हाफ बॉयफ्रेंडही असू शकतोच की! ते कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. हाफ गर्लफ्रेंड या टर्मिनॉलॉजीबद्दल तरुणाईला काय वाटतं? हे रिलेशनशिप स्टेटस असू शकतं का? ‘हाफ गर्लफ्रेंड’ या कन्सेप्टविषयी काही जणांनी आपली मतं ‘व्हिवा’शी शेअर केली.
संस्कृती सुर्वे
अश्विन निमदेवकर
अर्णव नायर
अनुजा रामगुडे
रेवती गोखले
अमिता पंडय़ा