उपनगरी रेल्वेखाली येऊन मृत्यू झालेल्या तरुणाचा तुटलेला हात तब्बल १६ तासांनी परत मिळविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. भायखळा येथे रेल्वे स्थानकाशेजारच्या पत्रा चाळीत राहणारा मोहम्मद रब्बानी अख्तर अंसारी हा १७ वर्षांचा तरूण रविवारी दुपारी रेल्वे मार्ग ओलांडत असताना गाडीखाली आला. त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याचा डावा हात गायब झाला होता. मोहम्मदचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सुपूर्द केला असला तरी त्याचा हरवलेला हात रेल्वे पोलीस शोधत होते.सोमवारी सकाळी रेल्वे पोलिसांना भायखळा स्थानकाच्या फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या गटारामध्ये मोहम्मदचा तुटलेला हात सापडला. अपघात झाला तेव्हा त्याच्या हाताचा चेंदामेंदा होऊन तो बाजूच्या गटारात पडला होता.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident man hand found after 16 hours wich was cut because of accident