अशोक लांडे खूनप्रकरणात आरोपी सचिन सातपुते याचा गुन्हय़ातून वगळण्यासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला. दरम्यान, आणखी एक आरोपी सचिन भानुदास कोतकर याच्या गैरहजेरीमुळे गुन्हय़ाचे दोषारोप निश्चितीचे कामकाज न्यायालयात झाले नाही. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी हा आदेश दिला. सातपुते याने गुन्हय़ातून वगळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर त्याचे वकील प्रसन्न जोशी तसेच जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांचा युक्तिवाद पूर्वीच पूर्ण झाला होता, आज हा अर्ज दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने फेटाळला.
दरम्यान, आरोपी सचिन कोतकर याने वकील महेश तवले यांच्यामार्फत अर्ज करत, वडील भानुदास कोतकर यांच्या जामीनअर्जासाठी आपण आज दिल्लीत असल्याने गैरहजर राहण्यासाठी परवानगी मागितली, त्यामुळे आरोप निश्चितीवरील सुनावणी दि. ७ रोजी ठेवण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2013 रोजी प्रकाशित
सचिन सातपुते याचा अर्ज फेटाळला
अशोक लांडे खूनप्रकरणात आरोपी सचिन सातपुते याचा गुन्हय़ातून वगळण्यासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला. दरम्यान, आणखी एक आरोपी सचिन भानुदास कोतकर याच्या गैरहजेरीमुळे गुन्हय़ाचे दोषारोप निश्चितीचे कामकाज न्यायालयात झाले नाही.

First published on: 28-09-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Application rejected of sachin satpute in ashok lande murder case