येथील राजेंद्रनगर मधील एका घरातून चोरटय़ांनी ४० हजार रूपये व एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. याबाबत फिरोज शहाजहान शेख (वय ३९) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेख यांनी घर खरेदीचा व्यवहार केला आहे. त्यासाठी त्यांनी ९० हजार रूपये जमविले होते. त्यातील ४० हजार रूपये त्यांनी तिजोरीच्या वरील बाजूस तर ५० हजार रूपये तिजोरीत ठेवले होते. सोमवारी शेख कुटुंबीय बारशाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. तिजोरीच्या वरच्या बाजूस असलेले ४० हजार रूपये व एक तोळे सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले. चोरी करतेवेळी चोरटय़ांनी गल्लीतील घरांच्या कडय़ा बाहेरून लावल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2013 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात घरफोडीत रोख रक्कम, दागिने लंपास
येथील राजेंद्रनगर मधील एका घरातून चोरटय़ांनी ४० हजार रूपये व एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी रात्री घडला.
First published on: 25-04-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cash and jewellery stolen in robbery at kolhapur