कोपरगाव तालुक्यात तीन-चार दिवस अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून काल रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांनी करंजी शिवारातून कैलास काशिनाथ लांडबिले यांच्या घरात प्रवेश करून सत्तर हजाराचे दागिने व पाच हजारांची रोकड चोरून नेली. चोरटय़ांनी लांडबिले यांच्या घरात घुसल्यानंतर त्यांची आई जिजाबाई व पत्नी सविता यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चार अज्ञात चोरटय़ांवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली.
यानंतर चोरटय़ांनी अंचलगाव शिवारात भाऊसाहेब शिंदे यांच्या वस्तीकडे मोर्चा वळवला, त्यांनी शिंदे यांच्या वडिलांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोनशे रूपये चोरले. इतर सामानाची उचकापाचकही केली पण त्यांना काही हाती लागले नाही. चोरटय़ानी दोन दिवस संवत्सर, रामवाडी, अंचलगाव येथे धुमाकूळ घातला असून त्यांच्या दहशतीने भयभीत झालेल्या लोकांनी एकत्र येऊन गस्त सुरू केली आहे. पोलिसही दरोडेखोरांच्या मागावार आहेत. हे दरोडेखोर मराठी व हिंदी बोलणारे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2013 रोजी प्रकाशित
करंजी शिवारात दागिने व रोकड लुटली
करंजी शिवारातून कैलास काशिनाथ लांडबिले यांच्या घरात प्रवेश करून सत्तर हजाराचे दागिने व पाच हजारांची रोकड चोरून नेली.
First published on: 06-08-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cash stolen with jewellery in karanji