डी.के.टी.ई. सोसायटी या टेक्स्टाइल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट व चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, तैवान यांच्यात परस्पर सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत दोन्ही संस्थेमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम चालविणे, दरवर्षी येथील चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह तैवान येथे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी अशा विविध बाबींचा समावेश असणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व डीकेटीई इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.कडोले यांनी दिली.
चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी तैवान यांनी डीकेटीईकडे विचारणा केली होती. त्याला अनुसरून प्राचार्य डॉ.पी.व्ही.कडोले यांनी चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी तैवान विद्यापीठाशी चर्चा केली होती. त्या वेळी कोणत्या प्रकारे डीकेटीईस चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सहकार्य करू शकेल, याची दिशा निश्चित करण्यात आली. या सहकार्याच्या कामास दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करून अंतिम स्वरूप देण्याच्या उद्देशाने चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ.येन.फाय हॉग यांना सदरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. संस्थेने आजपर्यंत वस्त्रोद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय करार केलेले आहेत. पण हा इंजिनिअरिंग क्षेत्रातील करार असलय़ाने याला विशेष महत्त्व आहे.    
दोन्ही संस्थातील या करारानुसार इंजिनिअरिंग विभागातील एकूण नऊ अभ्यासक्रम (ग्रॅज्युएट कोर्सेस)चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी येथे उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल मॅकेट्रॉनिक्स सिस्टिमस्, सिव्हिल अ‍ॅण्ड डिझास्टररिडक्शन इंजिनिअरिंग, सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी डीकेटीईस चिनकुओयुनिव्हर्सिटी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. यामध्ये नवीन अभ्यासक्रमांची रचना करणे, विद्यार्थ्यांना संशोधन संधी उपलब्ध करून देणे, शिक्षकांना एकत्रित प्रकल्प व सादरीकरण संधी उपलब्ध करून देणे आदी गोष्टी राबविण्यात येणार. या कराराअंतर्गत डीकेटीईच्या ४ विद्यार्थ्यांना दरवर्षी सी.टी.यू. येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यावेतन दिले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना १६० अमेरिकन डॉलर, महिना विद्यावेतन आणि १३० डॉलर प्रति सेमिस्टर राहण्याचा खर्च देण्यात येणार आहे.    
चिनकुओ युनिव्हर्सिटी ही तैवानमधील नामांकित शिक्षणसंस्था आहे. या संस्थेत सध्या सुमारे १२ हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डीकेटीईमध्ये असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होणार आहे. भविष्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास डीकेटीईस सीटीयू विद्यापीठ मदत करणार आहे. शिक्षणाबरोबरच संशोधन आणि उद्योग व समाज यांना सेवापुरविण्याच्या क्षेत्रातही दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे काम करावयाचे ठरविले आहे.    
पत्रकार परिषदेत डीकेटीईचे गव्‍‌र्हनिंग कौन्सिल सदस्य प्रकाश आवाडे यांनी सदर कराराबाबत माहिती दिली. या वेळी रामकाका कुलकर्णी, सपना आवाडे, उपप्राचार्या डॉ.एल.एस.अडमुठे व विभागप्रमुख उपस्थित होते.