आळंदीच्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थाना’तर्फे बोरीवलीत राजेंद्रनगर उड्डाण पुलाजवळील शिवसेवा मैदानावर १६ ते १८ एप्रिल दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्रीमंत माउली प्रतिष्ठान’ने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. विविध वारकरी, शिक्षण मंडळातील सुमारे १५० बालगोपाळ सेवक पारायणात सहभागी होतील. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ तसेच ह.भ.प. दादा महाराज शिरवळकर, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. डॉ. अमृतदास यांचे कीर्तन, डॉ. नारायण जाधव, ह.भ.प. थावरे महाराज, ह.भ.प. हरणे महाराज आदी महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकारांचे प्रवचन व निरूपण होणार आहे. १६ एप्रिलला अवधुत गांधी, डॉ. प्रचीती वैद्य व सहकाऱ्यांचा ‘अभंगवाणी’ व संत साहित्यातील लोकसंगीताचा कार्यक्रम, १७ एप्रिलला संगीतकार व गायक श्रीधर फडके यांचा ‘ओमकार स्वरूपा’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, १८ एप्रिलला सकाळी ७ वाजता ह.भ.प. बापुसाहेब मोरे यांचे कीर्तन होईल. आहे. संपर्क – नंदादीप तवकर – ८६५५०६५४१८, महेश सातारकर – ८६५५०६५४१७, विनीत सबनीस – ९५९४८८८४४०.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2013 रोजी प्रकाशित
बोरीवलीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
आळंदीच्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थाना’तर्फे बोरीवलीत राजेंद्रनगर उड्डाण पुलाजवळील शिवसेवा मैदानावर १६ ते १८ एप्रिल दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्रीमंत माउली प्रतिष्ठान’ने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
First published on: 14-04-2013 at 01:33 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dnyaneshwari parayan function in borivali