खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केलेला आरोपी संकेत ऊर्फ मोन्या संतोष विकारे (वय १९, रा. शनिमंदिराजवळ, वारजे) याने मंगळवारी रात्री वारजे पोलीस चौकीतून बेडीतून सुटका करत पलायन केले होते. त्याला वारजे पोलिसांना काही तासांत मार्केट यार्ड भागातून बुधवारी दुपारी अटक केली.
काही दिवसांपूर्वी विकारे याला बिबवेवाडी पोलिसांनी दरोडय़ाचा प्रयत्नाच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. तपासासाठी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर विकारे याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. त्याला या गुन्ह्य़ात येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन वारजे पोलीस चौकीत ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री वारजे चौकीत एका अपघाताचा गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू असताना हातामधील बेडीतून हात काढून विकारे याने पलायन केले. विकारे पळून गेल्याची माहिती समजाताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दरेकर यांनी आरोपीचे मित्र, नातेवाईक, घरावर नजर ठेवली होती. रात्रभर त्याचा कसून तपास सुरू होता. सकाळी आरोपी विकारे याने त्याच्या मित्राला पैशासाठी संपर्क साधला. त्यावरून पोलिसांना तो मार्केट यार्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांढरे, साळुंके, पोलीस कर्मचारी पांडुरंग वांजळे, रेणुसे, अतुल नेगे, पवार यांनी मार्केट यार्ड भागातून अटक केली.
याबाबत दरेकर यांनी सांगितले, की विकारे याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वीचा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्य़ात पूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. विकारे याची आर्थिक परिस्थती बेताचीच असून तो घरी कधी येत नव्हता. त्यामुळे या गुन्ह्य़ात शोध सुरू होता. त्याला या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती. जामीन होणार नाही, या भीतीने पळून गेल्याचे तो सांगत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
वारजे पोलीस चौकीतून पसार झालेल्या आरोपीला अटक
खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केलेला आरोपी संकेत ऊर्फ मोन्या संतोष विकारे (वय १९, रा. शनिमंदिराजवळ, वारजे) याने मंगळवारी रात्री वारजे पोलीस चौकीतून बेडीतून सुटका करत पलायन केले होते. त्याला वारजे पोलिसांना काही तासांत मार्केट यार्ड भागातून बुधवारी दुपारी अटक केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-12-2012 at 03:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested who ran over from varse police station