पूर्वी झालेल्या भांडणातून चाकू-कोयत्याने वार करून एका सतरा वर्षांच्या तरुणाचा खून केल्याची घटना ताडीवाला रस्त्यावरील खड्डा झोपडपट्टीत मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पाचजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक राजू घोडके (वय १७, रा. नवयुग तरुण मंडळाशेजारी, ताडीवाला रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खुनाच्या आरोपावरून राकेश भीमा माने (वय २०, रा. चमन बेकरी, ताडीवाला रस्ता) याच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन तरुण आहे. दीपक व अल्पवयीन आरोपीत काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. दीपक दादागिरी करतो म्हणून आरोपींनी त्याला मारण्याचा कट रचला. मंगळवारी दीपक ताडीवाला रस्त्यावरील सोनटक्के यांच्या घराजवळून जात असताना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पायावर, मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी या ठिकाणाहून पसार झाले. दीपकला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of yout from previous discord