भरधाव वेगाने चाललेल्या मोटारीची धडक बसल्याने रविवारी चार वाहनांचे जबरदस्त नुकसान झाले. यामध्ये एकजण जखमी झाला असून, त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मुख्य बसस्थानकाजवळ असलेल्या वटेश्वर मंदिराजवळ रविवारी हा अपघात घडला. टोयाटो इटिऑस(एम.एच.०९-बी.एक्स-८०२७) या भरधाव मोटारीची धडक समोर उभ्या असलेल्या रिक्षाला बसली. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षा काही अंतरावर असलेल्या इंडिका मोटारीस जाऊन धडकली. पुढे जाऊन ती एक दुचाकी व एका इनोव्हा मोटारीला धडकली. अपघातातील कार आदित्य मिरजे हे चालवीत होते. अपघात झाला तरी तो परस्परांमध्ये मिटवायच्या हालचाली सुरू होत्या.