मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाने पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या घटकांची बठक घेतली व संबंधितांनी उद्यापर्यंत (दि. ४) प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनेची स्थिती व भविष्यात करण्यात येणा-या उपाययोजनांचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील बठक सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयात ७ जून रोजी होणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाने प्रादेशिक अधिकारी एस एस डोके यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नपासह नदीकाठचे सर्व साखर कारखाने, औद्योगिक वसाहती व इचलकरंजी प्रोसेसधारकांच्या प्रतिनिधींची बठक झाली. यामध्ये जनहित याचिका दाखल करणारे दत्ता माने, सदा मालाबादे, वकील जयंत बलुगडे हे हजर होते.
या बठकीस खासकरून वकील धर्यशील सुतार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले ‘उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी करणे सर्वाचे कर्तव्य आहे. संबंधित घटकांनी नकारात्मक मानसिकता झटकून कामाला लागले पाहिजे. प्रदूषण रोखले तर कारवाईस सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सकारात्मक भूमिका घ्यावी.’ उच्च न्यायालयात १४ तारखेला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई येथे ७ जून ला मंडळाचे सदस्य सचिव यांच्यासमोर संबंधित घटकांची बठक घेतली जाणार आहे व त्यानंतर न्यायालयास अहवाल सादर केला जाणार आहे. या बठकीस इचलकरंजी नपाचे मुख्याधिकारी नितीन देसाई, जि. प चे कार्यकारी अभियंता एन. बी भोईर, कोल्हापूर मनपाचे अभियंता मनीष पवार व साखर कारखान्याचे प्रतिनिधी, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
पंचगंगाचे प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजना सादर करण्याचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाने पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या घटकांची बठक घेतली व संबंधितांनी उद्यापर्यंत (दि. ४) प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनेची स्थिती व भविष्यात करण्यात येणा-या उपाययोजनांचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
First published on: 04-06-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to submit remedy about stop pollution of panchganga