महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या तत्कालीन बहिस्थ विभागप्रमुखाला सहा महिने साधी कैद आणि दीड हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या दंडापैकी एक हजार रुपये त्या महिलेस देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी दिला. १२ ते १३ एप्रिल २०१२ दरम्याने पुणे विद्यापीठातच हा प्रकार घडला होता.
बाळासाहेब श्रीपती हेंद्रे (वय ५५, रा. इंदिराशंकर हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पुणे विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात शिपाई म्हणून कामाला होत्या. हेंद्रे याने घटनेच्या दिवशी सुटी असताना त्यांना कामावर बोलविले. तू माझ्याशी मैत्री करशील का, असे म्हणत तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर हेंद्रेला निलंबित केले होते. या खटल्यात सहायक सरकारी वकील ए. के. पाचरणे आणि फिर्यादीच्या वतीने एच. व्ही. डोईफोडे यांनी सात साक्षीदार तपासले. या गुन्ह्य़ाचा तपास सुनील ढाकणे यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2013 रोजी प्रकाशित
महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या विद्यापीठाच्या बहिस्थ विभागप्रमुखाला शिक्षा
महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या तत्कालीन बहिस्थ विभागप्रमुखाला सहा महिने साधी कैद आणि दीड हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
First published on: 16-01-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punishment to university area head because of missbehaviour with women