ज्येष्ठ लेखक राम जोशी यांचे १० डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दादरच्या छबिलदास विद्यालयात ४० वर्षे अध्यापनाचे काम केलेल्या राम जोशी यांचे अनेक कथासंग्रह, पुस्तके, कादंबऱ्या आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नक्षत्रांचे देणे’, ‘वसंत’ अशा अनेक मासिकांतून त्यांनी लेखन केले आहे. याशिवाय ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूटमध्ये कार्यवाह म्हणूनही काम केले होते.